agriculture news in Marathi, monsoon return from most part of Vidarbha, Maharashtra | Agrowon

विदर्भातून मॉन्सून परतला  
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १४) मोठा टप्पा पार करत देशाच्या बहुतांशी भागातून माघार घेतली. बहुतांश विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या उत्तरेकडील काही भागांतून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. गुरुवारपर्यंत (ता. १७) मॉन्सून संपूर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता आहे. पूर्व आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रीय होण्याची संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.       

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १४) मोठा टप्पा पार करत देशाच्या बहुतांशी भागातून माघार घेतली. बहुतांश विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या उत्तरेकडील काही भागांतून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. गुरुवारपर्यंत (ता. १७) मॉन्सून संपूर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता आहे. पूर्व आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रीय होण्याची संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.       

वायव्य भारतातील हवेच्या खालच्या थरात केंद्रभागी दाब अधिक असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती (ॲण्टी सायक्लोनीक सर्कुलेशन), सलग पाच दिवस पावसाची उघडीप, हवेतील बाष्पाचे कमी झालेले प्रमाण, वाऱ्यांची बदलेली दिशा आदी निरीक्षणानंतर मॉन्सूनने माघार घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मॉन्सूनने मंगळवारी (ता. १४) उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीमसह संपूर्ण ईशान्य भारत, छत्तीसगड, ओडिशासह दक्षिण भारतातील काही भागांतून माघार घेतली आहे. तर महाराष्ट्रातील विदर्भाचा बहुतांश भाग, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांतून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.   

यंदा देशात आठ दिवस उशिराने दाखल झालेला मॉन्सून महाराष्ट्रात सर्वांत उशिराने (२० जून) दाखल झाला. त्यानंतर चार दिवस उशिराने (१९ जुलै) मॉन्सूनने देश व्यापाला. आगमनाप्रमाणेच मॉन्सूनचा परतीचा प्रवास तब्बल सव्वा महिने लांबला.

१ सप्टेंबर रोजी राजस्थानातून माघारी फिरणाऱ्या मॉन्सूनने सर्वांत उशिराने बुधवारी (९ ऑक्टोबर) रोजी राजस्थानातून मुक्काम हलविला. त्यानंतर सातत्याने परतीचा प्रवास सुरू ठेवत देशाच्या बहुतांशी भागातून काढता पाय घेतला. साधारणत: १५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह देशभरातून माघारी फिरतो. दोन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून, तर १७ ऑक्टोबरपर्यंत देशभरातून मॉन्सून परतणार असल्याचे  हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
औरंगाबाद : केंद्रीय पथकाने अनुभवली पीक...औरंगाबाद  : मराठवाड्यात केंद्राच्या...
‘कोरडवाहू’चे वैचारिक सिंचनकोरडवाहू (जिरायती) शेती समस्यांबाबत दोन दिवसांचे...
पीकविम्या वरून शेतकऱ्यांनी केंद्रीय...अमरावती  ः पीकविमा हप्ता भरायची जशी सक्‍ती...
बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निधी शेतकरी...मुंबई  : लवकरच राज्यात सत्तेवर येणाऱ्या...
बोगस खतांची तक्रार केली होती : मिश्रखत...पुणे: राज्यात काही भागांमध्ये मिश्रखताचे बोगस...
संपूर्ण कर्जमाफीसाठी लागणार 'एवढी'...सोलापूर : मागील दोन वर्षांत दुष्काळ, पूर,...
कृषी कर्मचाऱ्यांवर दबाव कुणासाठी?पुणे : राज्याच्या कृषी विभागाकडून गेल्या काही...
केंद्र शासनाचे आदेश धाब्यावरपुणे : मिश्रखतांमधील बोगस उत्पादनाला पायबंद...
ढगाळ हवामानामुळे गारठा कमीपुणे: ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होऊन...
टेरेसगार्डनवर विषमुक्त फळे-भाज्यांची...रासायनिक अवशेषमुक्त अन्नाची निर्मिती हाच एकमेव...
रब्बी पिकांना 'इथे' आहे टोळधाडीचा धोका !नवी दिल्ली: देशात मॉन्सूनचा परतीचा प्रवास...
एकत्र कुटूंब कसतेय शेती, नियोजनातून...अविरत कष्टांची तयारी, एकत्रित कुटूंब पध्दतीमुळे...
संघर्षमय हंगामगेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी...
द्राक्ष शेतीला चालना कशी मिळेल?संपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...