agriculture news in Marathi, Monsoon return from North India, Maharashtra | Agrowon

मॉन्सून उत्तर भारतातून परतला
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शक्रवारी (ता. ११) उत्तर भारतातून पूर्णपणे माघार घेतली आहे. पूर्व आणि मध्य भारतातील राज्याच्या काही भागांतून मॉन्सूनने काढता पाय घेतला आहे. रविवारपर्यंत (ता. १३) देशाच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. यातच विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. या भागात कोरडे हवामान असल्याने लवकरच मॉन्सून परतण्यासाठी पोषक हवामान होत आहे. 

पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शक्रवारी (ता. ११) उत्तर भारतातून पूर्णपणे माघार घेतली आहे. पूर्व आणि मध्य भारतातील राज्याच्या काही भागांतून मॉन्सूनने काढता पाय घेतला आहे. रविवारपर्यंत (ता. १३) देशाच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. यातच विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. या भागात कोरडे हवामान असल्याने लवकरच मॉन्सून परतण्यासाठी पोषक हवामान होत आहे. 

मॉन्सूनने आतापर्यंतच्या सर्वांत उशिराने सुरू केलेल्या परतीच्या प्रवासात वेगाने वाटचाल सुरू केली आहे. साधारणत: १ सप्टेंबर रोजी परतीला निघणारा मॉन्सून यंदा तब्बल सव्वा महिना अधिकचा मुक्काम केल्यानंतर बुधवारी (ता. ९) पश्चिम राजस्थानमधून माघारी फिरला आहे. दुसऱ्याच दिवशी गुरुवारी (ता. १०) मॉन्सूनने हरियाना, चंदीगड, दिल्लीचा संपूर्ण भाग, राजस्थान व पंजाबचा बराचसा भाग, तसेच उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या काही भागांचा निरोप घेतला.

शुक्रवारी (ता. ११) जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान राज्याच्या संपूर्ण भाग, बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागांतून माघार घेतली आहे. परतीच्या पुढील वाटचाली पोषक हवामान असल्याने रविवारपर्यंत (ता. १३) मध्य, पूर्व आणि पश्चिम भारतातील राज्यामधून मॉन्सून परतेल, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

इतर अॅग्रो विशेष
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...