Agriculture news in Marathi Monsoon starts returning from Maharashtra | Agrowon

मॉन्सून महाराष्ट्रातून परतण्यास प्रारंभ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021

सोमवारी (ता. ११) पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यांच्या काही भागातून मॉन्सूनने काढता पाय घेतल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

पुणे : राजस्थानातून ६ ऑक्टोबर रोजी परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. सोमवारी (ता. ११) पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यांच्या काही भागातून मॉन्सूनने काढता पाय घेतल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

बुधवारी (ता. ६) पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागातून मॉन्सूनने माघार घेतली होती. त्यानंतर दोन दिवसात शुक्रवारी (ता. ८) वायव्य भारतातून मॉन्सून परतला. शनिवारी (ता. ९) मॉन्सूनने उत्तर भारतातून निरोप घेतला. सोमवारी (ता. ११) संपूर्ण झारखंड, बिहारसह मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या आणखी काही भागासह, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. 

परतीची सीमा सिलीगुडी, मालदा, शांतीनिकेतन, मिदनापूर, बारीपाडा, चिंचवाडा, इंदूर, गांधीनगर, राजकोट, पोरबंदर होती. देशाच्या आणखी काही भागातून वारे परतण्यासाठी पोषक हवामान आहे. बुधवारपर्यंत (ता. १३) मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगालचा बहुतांश भाग, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशाचा आणखी काही भाग, तसेच ईशान्य भारताच्या काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...