agriculture news in marathi, monsoon status, pune, maharashtra | Agrowon

मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

पुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. त्यानंतर मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागले आहेत. शुक्रवारी कर्नाटकात थोडी चाल केल्यानंतर मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाल्याने  उद्यापर्यंत (ता. १७) संपर्ण तमिळनाडू व्यापून कर्नाटकाच्या आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती शक्य असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  

पुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. त्यानंतर मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागले आहेत. शुक्रवारी कर्नाटकात थोडी चाल केल्यानंतर मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाल्याने  उद्यापर्यंत (ता. १७) संपर्ण तमिळनाडू व्यापून कर्नाटकाच्या आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती शक्य असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  

‘वायू’ चक्रीवादळामुळे थांबलेला उत्तरेकडील प्रवास सुरू करत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)  शुक्रवारी (ता. १४) दक्षिण कर्नाटकच्या मंगळूर, मैसूर, तमिळनाडूतील सालेम, कुड्डालोरपर्यंत मजल मारली. ईशान्य भारतातील त्रिपुरा, असाम आणि अरुणाचल प्रदेश राज्याच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला. उद्यापर्यंत संपूर्ण तमिळनाडूसह कर्नाटकाचा आणखी काही भाग, मध्य अरबी समुद्र आणि पूर्व भारतातील सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या उत्तर भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

‘वायू’ चक्रीवादळ सौराष्ट्र, कच्छकडे सरकणार
अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत घोंघावत असलेले अतितीव्र वायू चक्रीवादळ हळूहळू ओसरत आहे. रविवारपर्यंत (ता. १६) वादळाची तीव्रता आणखी कमी होणार आहे. शनिवारी (ता. १५) सकाळी साडेआठ वाजता हे वादळ गुजरातच्या किनाऱ्यावरील पोरबंदरपासून पश्चिमेकडे २७५ किलोमीटर, वेरावळपासून ३३० किलोमीटर, तर दीवपासून ३८५ किलोमीटर पश्चिमेकडे होते. हे वादळ सोमवारी सायंकाळपर्यंत निवळणार असून, तीव्र कमी दाब क्षेत्राची ही प्रणाली सौराष्ट्र आणि कच्छकडे जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी या भागात ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.  

इतर अॅग्रो विशेष
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...