agriculture news in marathi, monsoon status, pune, maharashtra | Agrowon

मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य व्यापण्याचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 जून 2019

पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी (ता. २०) कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोचणाऱ्या मॉन्सूनने सलग तिसऱ्या दिवशी प्रगती सुरूच ठेवली आहे. शुक्रवारी (ता. २१) राज्यात थोडीशी चाल करत सांगलीपर्यंत धाव घेणारा मॉन्सून, शनिवारी (ता. २२) मध्य महाराष्ट्रातील सोलापूरचा काही भाग व्यापून मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिण भागात दाखल झाला आहे. मंगळवारपर्यंत (ता. २५) मॉन्सून सर्व राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी (ता. २०) कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोचणाऱ्या मॉन्सूनने सलग तिसऱ्या दिवशी प्रगती सुरूच ठेवली आहे. शुक्रवारी (ता. २१) राज्यात थोडीशी चाल करत सांगलीपर्यंत धाव घेणारा मॉन्सून, शनिवारी (ता. २२) मध्य महाराष्ट्रातील सोलापूरचा काही भाग व्यापून मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिण भागात दाखल झाला आहे. मंगळवारपर्यंत (ता. २५) मॉन्सून सर्व राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

केरळात यंदा आठवडाभर उशिराने आलेल्या मॉन्सूनच्या वाटचालीवर अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे परिणाम झाला. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावलाच, तसेच बाष्प ओढून नेल्याने पाऊसही लांबला. महाराष्ट्रातील आगमन उशिराने होत १९७२ नंतर यंदाही मॉन्सून तळ कोकणात पोचण्यासाठी २० जूनपर्यंतची वाट पाहावी लागली. त्यानंतर मात्र मॉन्सूनचा उत्तरेकडील प्रवास वेगाने होत आहे. शनिवारी (ता. २२) मॉन्सूनने मध्य महाराष्ट्रातील सोलापूरचा काही भाग, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा दक्षिण भाग, विदर्भातील ब्रह्मपुरीपर्यंतचा भाग व्यापला आहे.

दरम्यान, पश्चिम भागापेक्षा पूर्व भारतातून मॉन्सूनचा प्रगतीचा वेग अधिक आहे. दोन दिवसांत मॉन्सूनने मोठा पल्ला गाठला असून, शनिवारी कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार ही राज्य संपूर्ण व्यापून, छत्तीसगड, उत्तर प्रदेशाच्या काही भागापर्यंत मजल मारली आहे. वाटचालीस पोषक हवामान असल्याने मंगळवारपर्यंत दक्षिण गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशाच्या काही भागापर्यंत मॉन्सून पोचेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...
मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी...परभणी: मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी व्यापक...
शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीतून...बुलडाणा  ः कृषी विभागाने लष्करी अळीच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होणार...नाशिक: बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड...
लष्करी अळीची शेतकऱ्यांमध्ये धास्तीरुईखेड मायंबा, जि. बुलडाणा ः ‘‘अमेरिकन लष्करी...
फवारणी केलेला मका चाऱ्यात वापरू नका:...पुणे (प्रतिनिधी)ः  राज्यात सध्या मक्यावर...
लष्करी अळीमुळे डेअरी, पोल्ट्रीला १३००...पुणे : राज्यातील डेअरी व पोल्ट्री उद्योगासाठी...
बाजार समित्यांतील रोख व्यवहारांवरील...नवी दिल्ली ः रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणून...
अन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितचशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच...
मराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ! चिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक...
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...