agriculture news in marathi, monsoon status, pune, maharashtra | Page 2 ||| Agrowon

मॉन्सूनचे आगमन लांबल्याने पावसाची ओढ

अमोल कुटे
गुरुवार, 4 जुलै 2019

पुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाने वाट रोखून धरल्याने राज्यात यंदा मॉन्सून आगमन यंदा खूपच उशिराने झाले. यातच पूर्वमोसमी पावसानेही समाधानकारक हजेरी न लावल्याने दुष्काळाची तीव्रता वाढली. मात्र महिन्याच्या सुरवातीला झालेला वळीव आणि मॉन्सून दाखल झाल्यानंतर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यातील हजेरीने कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत जूनची कशीबशी सरासरी गाठता आली.  विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत अपुरा पाऊस पडला.

पुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाने वाट रोखून धरल्याने राज्यात यंदा मॉन्सून आगमन यंदा खूपच उशिराने झाले. यातच पूर्वमोसमी पावसानेही समाधानकारक हजेरी न लावल्याने दुष्काळाची तीव्रता वाढली. मात्र महिन्याच्या सुरवातीला झालेला वळीव आणि मॉन्सून दाखल झाल्यानंतर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यातील हजेरीने कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत जूनची कशीबशी सरासरी गाठता आली.  विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत अपुरा पाऊस पडला. कृषी विभागाकडील नोंदीनुसार १ ते ३० जून या कालावधीत राज्यात १६०.२ मिलिमीटर (७१.७ टक्के), तर हवामान विभागाच्या नोंदीनुसार १५५.३ मिलिमीटर (७५ टक्के) पाऊस पडला. 

कृषी विभागाकडील पावसाच्या नोंदीनुसार राज्यातील ३५२ पैकी २०० तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, यातील ७५ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आणि चार तालुक्यांत २५ टक्केदेखील पाऊस झालेला नाही. ६६ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. यात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात यंदा सर्वाधिक २०१.७ टक्के पाऊस झाला असून, आंबेगावसह, खेड (जि. पुणे), कागल, करवीर, शिरोळ (जि. कोल्हापूर), मिरज (जि. सांगली) सातारा (जि. सातारा) श्रीगोंदा (जि. नगर) या आठ तालुक्यांत १५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण (१८.२ टक्के), भंडारा जिल्ह्यातील पवनी (२४.९ टक्के), लाखांदूर (१७.६ टक्के), गोंदियातील मोरगाव अर्जुनी (२३.७ टक्के) या चार तालुक्यांमध्ये सरासरीच्या २५ टक्क्यांहून कमी पाऊस पडला आहे. 

हवामान विभागाकडील नोंदीनुसार जून महिन्यात कोकणात (९३ टक्के) सरासरी पाऊस झाला. उर्वरित तीनही विभागांत अपुरा पाऊस पडला. विदर्भात यंदा सर्वांत कमी ५३ टक्के पाऊस झाला, तर मराठवाड्यात (६८ टक्के), मध्य महाराष्ट्रात (७९ टक्के) पावसाने ओढ दिली. कोकणातील सर्व जिल्ह्यांत, मध्य महाराष्ट्रातील धुळे, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद आणि विदर्भातील बुलडाणा या मोजक्या जिल्ह्यांत सरासरीच्या जवळपास पाऊस पडला. ठाणे, पुणे, नगर जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ११० तर भंडारा जिल्ह्यात सर्वांत कमी ३१ टक्के पाऊस पडला. गोंदिया, वर्धा, हिंगोली, नंदूरबार जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली. 

४७ वर्षांनंतर मॉन्सून उशिराने दाखल
मॉन्सूनने यंदा आठ दिवस उशिराने ८ जूनला केरळात हजेरी लावली. मॉन्सूनची वाटचाल राज्याकडे सुरु असतानाच अरबी समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. ‘वायू’ने मॉन्सूनची वाट रोखून धरली, त्याबरोबरच बाष्प ओढून नेल्याने पाऊसही लांबला, पूर्वमोसमीचा पाऊसही थांबला. मात्र कोकण किनारपट्टीवर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. ११ जूनला तयार झालेले चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत अतितीव्र झाले. १७ जूनपर्यंत सुमद्रात घोंगावणारे वादळ निवळल्यानंतर मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत झाले. राज्यात १९७२ नंतर ४७ वर्षांनी मॉन्सूनचे उशिराने आगमन झाले. मॉन्सून राज्यात पोचण्यासाठी दोन आठवड्यांचा उशीर होत २० जूनचा दिवस उजाडला. त्यानंतर पाच दिवसांत (२५ जून) मॉन्सूनने संपूर्ण राज्य व्यापले, मॉन्सूनचा प्रवास उशिराने सुरू असून, अद्याप वायव्य भारताच्या बहुतांशी भागात मॉन्सून पोचलेला नाही.

जून महिन्यात तालुकानिहाय पडलेल्या पावसाचे प्रमाण  
कोकण : ५० ते ७५ टक्के : मुरूड, श्रीवर्धन, म्हसला, दापोली, खेड, सावंतवाडी, वैभववाडी, दोडामार्ग, जव्हार, मोखडा, तलासरी.

७५ ते १०० टक्के : शहापूर, अलिबाग,  कर्जत, खालापूर, उरण, सुधागड, पेण, महाड, माणगाव, रोहा, पोलादपूर, तळा, चिपळूण, गुहागर, मंडणगड, रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूर, लांजा, देवगड, वेंगुर्ला, कणकवली, कुडाळ, वसई, डहाणू, विक्रमगड.

१०० टक्क्यांपेक्षा अधिक : ठाणे, कल्याण, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ, पनवेल, मालवण, वाडा, पालघर.

मध्य महाराष्ट्र : २५ टक्क्यांपेक्षा कमी : कळवण. २५ ते ५० टक्के : बागलाण, दिंडोरी, इगतपुरी, निफाड, देवळाली, धुळे, साक्री, शहादा, तळोदा, अक्राणी, अक्कलकुवा, धरणगाव, मोहोळ, करमाळा.

५० ते ७५ टक्के : मालेगाव, येवला, चांदवड, त्र्यंबकेश्‍वर, शिंदखेडा, नंदुरबार, नवापूर, जळगाव, भुसावळ, यावल, अमळनेर, पारोळा, चाळीसगाव, भडगाव, बोदवड, नेवासा, श्रीरामपूर, बारामती, इंदापूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, माढा, माळशिरस, राधानगरी, बावडा, आजरा, चंदगड.
 

७५ ते १०० टक्के : नांदगाव, सुरगाणा, नाशिक, पेठ, सिन्नर, शिरपूर, रावेर, मुक्ताईनगर, एरंडोल, पाचोरा, नगर, शेवगाव, राहुरी, संगमनेर, वेल्हा, अक्कलकोट, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, पाटण, माण-दहिवडी, फलटण, खानापूर-विटा, पन्हाळा.  

१०० टक्क्यांपेक्षा अधिक : जामनेर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, अकोले, कोपरगाव, राहाता, हवेली, मुळशी, भोर, वडगाव मावळ, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, दौंड, पुरंदर, सातारा, जावळीमेढा, कराड, कोरेगाव, खटाव, खंडाळा, वाई, महाबळेश्‍वर, मिरज, जत, वाळवा, तासगाव, शिराळा, आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी, करवीर, कागल, गडहिंग्लज, भुदरगड. 

मराठवाडा : २५ ते ५० टक्के : बदनापूर, गेवराई, औसा, चाकूर, कळंब, लोहरा, देगलूर, किनवट, मुदखेड, हिमायतनगर, धर्माबाद, पाथरी, जिंतूर, कळमनुरी.

५० ते ७५ टक्के : पैठण, कन्नड, सोयगाव, जालना, मंठा, आष्टी, माजलगाव, अंबाजोगाई, केज, परळी, धारूर, वडवणी, लातूर, अहमदपूर, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट, उस्मानाबाद, परांडा, भूम, उमरगा, नांदेड, बिलोली, मुखेड, लोहा, हदगाव, भोकर, माहूर, उमरी, अर्धापूर, नायगाव (खैरगाव), परभणी,  पालम, सेलू, हिंगाली, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव.

७५ ते १०० टक्के : औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, भोकरदन, जाफराबाद, अंबेड, परतूर, बीड, पाटोदा, उदगीर, रेणापूर, तुळजापूर, वाशी, कंधार, गंगाखेड, पूर्णा, मानवत, सोनपेठ.

१०० टक्क्यांपेक्षा अधिक : वैजापूर, फुलंब्री, घनसांगवी, शिरूर कासार.

विदर्भ : २५ टक्क्यांपेक्षा कमी : पवनी, लाखांदूर, मोरगाव अर्जुनी.

२५ ते ५० टक्के : बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, तिवसा, मोर्शी, वरूड, अचलापूर, कळंब, केळापूर, आर्वी, करंजा, आष्टी, वर्धा, सेलू, देवळी, कामठी, हिंगणा, रामटेक, पारशिवणी, मौदा, नरखेड, कळमेश्‍वर, उमरेड, भिवापूर, भंडारा, मोहाडी, साकोली, लाखनी, आमगाव, सालकेसा, देवरी, सडक अर्जुनी, मूल, ब्रह्मपुरी, नागभिड, सिंदेवाही, कुरखेडा, चामोर्शी, सिरोंचा, अहेरी, धानोरा, कोरची, देसाईगंज, मुलचेरा.

५० ते ७५ टक्के : देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, मलकापूर, अकोट, बाळापूर, बाभूळगाव, अकोला, वाशीम, रिसोड, मालेगाव, कारंजालाड, धारणी, चिखलदरा, भातकुली, दर्यापूर, चांदूरबाजार, यवतमाळ, बाभूळगाव, दिग्रस, अर्णी, पुसद, उमरखेड, मोहगाव, वणी, मारेगाव, झारी झामणी, घाटंजी, राळेगाव, हिंगणघाट, समुद्रपूर, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, काटोल, सावनेर, कुही, गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, गोंडपिंपरी, चिमूर, राजूरा, पोंभुर्णा, गडचिरोली, अरमोरी, एटापल्ली, भामरागड.

७५ ते १०० टक्के : चिखली, मेहकर, खामगाव, मोताळा, नांदुरा, मंगरुळपीर, मानोरा, अमरावती, नांदगाव खंडेश्‍वर, चांदूर रेल्वे, अंजनगाव, धामणगाव रेल्वे, दारव्हा, तुमसर, चंद्रपूर, भद्रावती, सावळी, बल्लारपूर.

१०० टक्क्यांपेक्षा अधिक : जळगाव जामोद, संग्रामपूर, बुलडाणा, शेगाव, तेल्हारा, नेर, वरोरा, कोरपना, जेवती. 

 

राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती (स्रोत - हवामान विभाग) 
जिल्हा  सरासरी पाऊस पडलेला पाऊस  टक्केवारी
पालघर ४११.९  ३७३.६ ९१
रायगड   ६५५.८  ६१४.२ ९४
रत्नागिरी  ८१३.५ ७१९.८   ८८
सिंधुदुर्ग   ८८०.१ ८२९.९  ९४
ठाणे  ४६१.९  ५०३.०  १०९
नगर  १०८.२ ११२.७  १०४
धुळे   १२१.५ १०७.४  ८८
जळगाव  १२३.७  ७९.९  ६५
कोल्हापूर   ३६२.९  ३०८.५  ८५
नंदुरबार   १५५.९ ५३.६  ३४
नाशिक   १७४.४  ९७.८  ५६
पुणे  १७६.२  १९३.१ ११०
सांगली ११९.०  ८९.४  ६९
सातारा १५०.७ १६७.१   ८६
सोलापूर    १०२.७   ५२.१ ५१
औरंगाबाद  १३०.४ १०१.७ ८१
बीड      १२८.३ ८५.३ ६६
हिंगोली  १८५.२ ६६.२  ३९
जालना  १३९.३ १०४.९ ७९
लातूर  १४४.८  १०१.५  ७५
नांदेड  १५५.२  ७३.६ ४७
उस्मानाबाद १३२.१ १०१.८ ८०
परभणी   १५४.६ १०२.९ ७१
 अकोला   १४२.९  १०४.० ७६
अमरावती   १३७.२ ८३.४  ५७
भंडारा १६८.० ५७.९  ३१
बुलडाणा १३९.७  १२९.९ ९३
चंद्रपूर   १८०.६ १२५.९ ६९
गडचिरोली २०९.२  ९१.५   ४३
गोंदिया   १७४.१  ६२.८ ३३
नागपूर  १५८.०  ७९.८ ४८
वर्धा १६९.७  ६९.२  ४०
वाशीम  १७३.० ९१.५  ५५
यवतमाळ १७३.६ ७४.१ ४५

 

हवामान विभागनिहाय पडलेला पाऊस (स्रोत - हवामान विभाग)
विभाग  सरासरी पाऊस  पडलेला पाऊस टक्केवारी
कोकण ६८९.७ ६४२.१ ९३
मध्य महाराष्ट्र  १५७.० १२३.३ ७९
मराठवाडा  १३८.० ९२.३ ६७
विदर्भ  १७०.६ ९१.० ५३

 


इतर अॅग्रो विशेष
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...