महाराष्ट्रात माॅन्सूनची पुन्हा प्रगती...

महाराष्ट्रात माॅन्सूनची प्रगती
महाराष्ट्रात माॅन्सूनची प्रगती

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज (ता. ९) बहुतांशी कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अाणखी काही भाग व्यापला आहे. माॅन्सूनने मुंबईसह ठाणे, नगर, परभणी, यवतमाळ, चंद्रपूरपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मॉन्सूनने शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात एकाच वेळी प्रवेश करत महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी आणखी राज्याच्या आणखी काही भागापर्यंतचा टप्पा पुर्ण करताना मध्य अरबी समुद्राचा काही भाग, कोकणाचा बहुतांशी भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा आणखी काही भाग व्यापला. छत्तीसगड, आडिशा, वायव्य बंगालच्या उपसारामध्येही मॉन्सूनने प्रगती केली आहे. मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती असल्याने सोमवारपर्यंत (ता.११) छत्तीसगड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, सिक्कीमपर्यंत प्रगती शक्य अाहे. तर बुधवारपर्यंत (ता. १३) झारखंड आणि बिहार राज्यात मॉन्सून पोचण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com