मॉन्सूनची सांगलीपर्यंत धाव...

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता. २०) कोकणात दमदार हजेरी लावत रत्नागिरी, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या कोल्हापूरपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (ता. २१) राज्यात थोडीशी चाल करत सांगलीपर्यंत धाव घेतली आहे. तर दक्षिण भारतातील राज्ये आणि पूर्व भारतात मोठी मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाला असला, तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.  

केरळात यंदा आठवडाभर उशिराने आलेल्या मॉन्सूनच्या वाटचालीवर अरबी समुद्रात असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे परिणाम झाला. त्यानंतर १९७२ नंतर यंदा मॉन्सून महाराष्ट्रात पोचण्यासाठी २० जूनपर्यंतची वाट पाहावी लागली.  

मात्र मॉन्सूनचा उत्तरेकडील प्रवास वेगाने होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (ता. २१) मॉन्सूनने महाराष्ट्रातील सांगलीपर्यंत, तसेच तमिळनाडूचा उर्वरित भाग, संपूर्ण आंध्र प्रदेश, तेलंगणाचा काही भाग, केरळचा आणखी भाग, छत्तीसगड, ओडिशाचा दक्षिण भागापर्यंत मजल मारली. सोमवारपर्यंत (ता. २४) मॉन्सून संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापून विदर्भाच्या काही भागांत पोचण्याची शक्यता हवामान वर्तविण्यात आली आहे.  

महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत समुद्राला उधाण आले असून, जोरदार वारे वाहत आहेत. यातच समुद्रावर ढग गोळा होऊ लागले आहेत. राज्याच्या अनेक भागांत अंशतः ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे मॉन्सून दाखल होण्याबरोबरच पावसाने जोर धरण्याची अपेक्षा आहे. बंगालच्या उपसागरात ईशान्य भागात हवेचे कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com