agriculture news in Marathi, Monsoon will be late in country, Maharashtra | Agrowon

मॉन्सूनचा मुक्काम लांबणार
अमोल कुटे
रविवार, 15 सप्टेंबर 2019

पुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या प्रवासासाठी पोषक हवामान नसल्याने यंदाही नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) देशातील मुक्काम लांबण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार १ सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानमधून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. गतवर्षी (२०१८) २९ सप्टेंबर रोजी, तर २०१५ मध्ये ४ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला होता. यंदाच्या हंगामात अद्यापही पश्चिम राजस्थानमधून मॉन्सून माघारी फिरलेला नाही.

पुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या प्रवासासाठी पोषक हवामान नसल्याने यंदाही नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) देशातील मुक्काम लांबण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार १ सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानमधून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. गतवर्षी (२०१८) २९ सप्टेंबर रोजी, तर २०१५ मध्ये ४ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला होता. यंदाच्या हंगामात अद्यापही पश्चिम राजस्थानमधून मॉन्सून माघारी फिरलेला नाही.

हवामान विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले की, मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची घोषणा करण्यासाठी सलग पाच दिवस पावसाची उघडीप असणे, हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होणे, हवेचा खालच्या थरात केंद्रभागी दाब अधिक असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती (अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन) निर्माण होणे आवश्यक असते.  

पश्चिम राजस्थानमध्ये अद्यपाही अधूनमधून पाऊस पडत आहे. सकाळच्या वेळी बाष्पाचे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांवर जात असल्याचे दिसून येत आहे. शिवाय या भागात पुढील पाच दिवसात पावसाचा अंदाज आहे. जवळपास आठवडाभर हीच स्थिती कायम राहण्याचे संकेत असून, तोपर्यंत मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता नाही. 

दरम्यान, मॉन्सूनचे लांबलेले आगमन हे यंदाच्या हंगामाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. सुरवातीपासूनच मॉन्सूनची वाटचाल अडखळत झाली. १८ मे रोजी अंदमानात पोचलेल्या मॉन्सूनचा पुढील प्रवास लांबला. देवभूमी केरळात तब्बल आठवडाभर उशीराने ८ जून रोजी मॉन्सून दाखल झाला. अरबी समुद्रात तयार झालेल्या अतितीव्र ‘वायू’ चक्रीवादळाने मॉन्सूनची वाटचाल रोखून धरली. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावलाच, तसेच बाष्प ओढून नेल्याने पाऊसही लांबला.

साधारणत: ७ जूनपर्यंत तळ कोकणात पोचणारा मॉन्सून, यंदा २० जून रोजी तळकोकणात पोचला. तसेच २५ जून रोजी वाऱ्यांनी राज्य व्यापले. त्यांनतर मजल दरमजल करत दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या पाच दिवस उशिराने म्हणजेच १९ जुनै रोजी मॉन्सूनने देश व्यापला. सध्या संपूर्ण देशात मॉन्सूनचे अस्तित्व असून, परतीचा प्रवासाची सुरवात आणखी लांबण्याची शक्यता आहे. 

वर्ष तारीख
२०१३ ९ सप्टेंबर
२०१४ २३ सप्टेंबर
२०१५ ४ सप्टेंबर
२०१६ १५ सप्टेंबर
२०१७ २७ सप्टेंबर
२०१८ २९ सप्टेंबर

 

इतर अॅग्रो विशेष
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...