agriculture news in Marathi, monsoon will exit from Maharashtra today, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मॉन्सून आज घेणार महाराष्ट्राचा निरोप

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. १५) संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यातून माघार घेतली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागांसह बहुतांशी राज्यातून मॉन्सून परतला आहे. आज (ता. १६) मॉन्सून महाराष्ट्राचा, तर उद्या (ता. १७) संपूर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता आहे. मॉन्सून देशभरातून परतताच ईशान्य, पूर्व आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रीय होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.       

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. १५) संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यातून माघार घेतली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागांसह बहुतांशी राज्यातून मॉन्सून परतला आहे. आज (ता. १६) मॉन्सून महाराष्ट्राचा, तर उद्या (ता. १७) संपूर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता आहे. मॉन्सून देशभरातून परतताच ईशान्य, पूर्व आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रीय होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.       

सोमवारी (ता. १४) जवळपास निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेत मॉन्सूनने विदर्भाचा संपूर्ण भाग, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांचा निरोप घेतला होता. तर मंगळवारी विदर्भ, मराठवाड्याचा संपूर्ण भाग, कोकणातील रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंतच्या भागातून माघार घेतली. संपूर्ण ओडिशा, छत्तीसगडसह उत्तर कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेशच्या काही भागांतून मॉन्सून परतला आहे. 

गेल्या आठवड्यात बुधवारी (ता. ९) पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थानमधून मॉन्सून माघारी फिरला. यंदाचा मॉन्सून आतापर्यंतच्या सर्वांत उशिराने परतीच्या प्रवासाला निघाला. यापूर्वी १ ऑक्टोबर १९६१ मध्ये सर्वांत उशिराने माघारी फिरला होता. त्यांनतर २००७ मध्ये ३० सप्टेंबर रोजी राजस्थानातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता.

साधारणत: १ सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू करणारा मॉन्सून सव्वा महिना उशिराने माघारी फिरला. त्यांनतर आठवडाभरातच मॉन्सून देशातील बहुतांशी भागातून परतला आहे. महाराष्ट्रातून साधारणत: १५ ऑक्टोबरला मॉन्सून परत जातो. आज (ता. १६) मॉन्सून राज्यातून, तर उद्या (ता. १७) संपूर्ण देशातून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.


इतर बातम्या
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
सिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
मोर मध्यम प्रकल्पाच्या कालवा...हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...