agriculture news in Marathi monsoon will reach in Karnatka today Maharashtra | Agrowon

मॉन्सून कर्नाटकात आज धडकणार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता.१) देवभुमी केरळमध्ये दाखल झाले आहे. मंगळवारी (ता.२) मॉन्सूनने प्रगती केली नाही.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता.१) देवभुमी केरळमध्ये दाखल झाले आहे. मंगळवारी (ता.२) मॉन्सूनने प्रगती केली नाही. मात्र पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने आज (ता.३) कर्नाटक, मध्य अरबी समुद्रासह, बंगालच्या उपसागराच्या आणखी भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

अरबी समुद्रात असलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे वाऱ्यांना खेचून आणल्याने मॉन्सून नियमित वेळवर १ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. मॉन्सूनने सोमवारी केरळच्या कन्नूर, तामिळनाडूच्या कोईंबतूर, कन्याकुमारीपर्यंतचा भाग व्यापला. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत जाताना किनारपट्टीलगत मॉन्सूनची आणखी वाटचाल होण्याची शक्यता आहे. आज (ता.१) केरळ, कोमोरीनचा संपूर्ण भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, पदुच्चेरीसह आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान असल्याची शक्यता आहे. 

अरबी समुद्रात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात १७ मे रोजी मॉन्सून दाखल झाला. वादळ उत्तरेकडे सरकून, बाष्प आढून नेल्याने मॉन्सूनची वाटचाल थांबली. २७ मे रोजी मॉन्सूनने पुढे चाल केली. २८ मे रोजी बंगालच्या उपसागरात प्रगती केल्यानंतर पुढील वाटचाल पुन्हा अडखळली आहे. आज दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 


इतर अॅग्रो विशेष
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...