agriculture news in Marathi monsoon will reach in Kerala on time Maharashtra | Agrowon

मॉन्सून यंदा वेळेवर 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 मे 2021

सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे यंदा एक जून रोजी मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता आहे.

पुणे : सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे यंदा एक जून रोजी मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता आहे. दहा जूनपर्यंत तळकोकणात दाखल होईल. तर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. 

यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज नुकताच हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात वेगाने बदल होत असल्याने मॉन्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण बनत आहे. यासंदर्भातलं परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं असून, त्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मॉन्सून समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. 

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन म्हणाले, की भारतीय हवामान विभाग १५ मेच्या दरम्यान पावसाळ्याचा अधिकृत अंदाज जाहीर करेल. यंदा दक्षिण-पश्‍चिम मॉन्सून सामान्य राहील. जून ते सप्टेंबर या कालावधीत सामान्य पाऊस होईल. मॉन्सूनची दीर्घकालीन सरासरी ९८ टक्के होईल, जी सर्वसाधारण श्रेणीत येते. या वर्षी मॉन्सून सामान्य राहण्याची अपेक्षा आहे.

९६ ते १०४ टक्के दरम्यान पाऊस पडणे सामान्य मानले जाते. त्यानुसार ‘आयएमडी’ने २०२१ या वर्षात नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी पहिल्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाज नुकताच व्यक्त केला आहे. देशभर मोसमी पाऊस जून ते सप्टेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून ते दीर्घ मुदतीच्या सरासरीसह ९६ ते १०४ टक्के राहील. 

पावसाळ्यातील हवामान अंदाज हे वेळोवेळी सुधारित दिले जात असून, पावसाच्या क्षेत्रासाठी वेगवेगळे अंदाज वर्तविले आहेत. 

राज्यातही वेळेवर येणार 
मागील २ वर्षांत अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मॉन्सून लांबला होता. मात्र सध्या अशी कोणतीही चिन्ह दिसत नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे केरळात जर मॉन्सून वेळेवर दाखल झाला, तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.  

प्रतिक्रिया 
हवामान खात्याच्या दीर्घकालीन अंदाजानुसार मॉन्सून एक जूनच्या आसपास केरळमध्ये धडकेल. मॉन्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज १५ मे रोजी वर्तविला जाईल. तसेच मे, जून, जुलै आणि ऑगस्टच्या शेवटी मासिक अंदाज देण्यात येईल. 
- एम. राजीवन, सचिव, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे 
 

 
 


इतर बातम्या
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
मराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणारकोल्‍हापूर : इथून पुढील काळात कोणत्याही...
खानदेशात युरियाची टंचाईजळगाव : खानदेशात खरिपास हवी तशी सुरुवातदेखील...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...