मॉन्सून उद्या केरळात पोचण्याची शक्यता

हवामान
हवामान

पुणे: नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. ५) श्रीलंका देशाचा जवळपास निम्मा भाग व्यापला आहे. तर देवभूमी केरळसह देशात वाऱ्यांचे आगमन होण्यास अनुकूल हवामान तयार झाले आहे. उद्या (ता. ८) मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर अरबी समुद्रात रविवारी (ता. ९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. बुधवारी (ता. ५) वाऱ्यांनी श्रीलंकेतील कोलंबोच्या उत्तरेकडे असलेल्या कातूनायके शहरापर्यंतचा टप्पा पार करून जवळपास निम्मा श्रीलंका देश व्यापला आहे. तर अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत वाऱ्यांनी प्रगती केली आहे. विषुववृत्ताकडून येत असलेले वाऱ्यांचे प्रवाह, दक्षिण भागात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ३.६ किलोमीटर उंचीवर असलेले हवेचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र, तसेच महाराष्ट्र आणि केरळच्या किनाऱ्याला समांतर हवेच्या कमी दाब पट्ट्याची होत असलेली निर्मिती, यामुळे शनिवारी (ता. ८) देवभूमी केरळात दाखल होण्यास पोषक हवामान झाले आहे. अरबी समुद्रात केरळ-कर्नाटक किनारपट्टीलगत हवेचे कमी दाब क्षेत्र तयार होत आहे. किनारपट्टीलगत उत्तरेकडे सरकत जाणारी ही प्रणाली आणखी तीव्र होत जाण्याचे संकेत आहेत. मॉन्सून केरळात दाखल झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या या क्षेत्राच्या वाटचालीवर मॉन्सूनची प्रगती ठरणार आहे. तर बंगालच्या उपसागरावरील मॉन्सूनची शाखा रविवारपर्यंत (ता. ९) ईशान्य भारतातील काही राज्यांत पोचण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com