मॉन्सून आज केरळात धडकणार 

गेल्या चार दिवसांपासून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) प्रवाह सक्रिय नसल्याने, तसेच पुरेशा बाष्पाअभावी पावसाने दडी मारल्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) केरळमधील आगमन लांबले होते.
monsoon
monsoon

पुणे : गेल्या चार दिवसांपासून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) प्रवाह सक्रिय नसल्याने, तसेच पुरेशा बाष्पाअभावी पावसाने दडी मारल्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) केरळमधील आगमन लांबले होते. मॉन्सूनची अखडलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली असून, आज (ता. ३) मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, केरळच्या अनेक भागांत जोरदार पाऊस पडत आहे.  अंदमान बेटांवर २१ मे रोजी दाखल झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात ‘यास’ चक्रीवादळ तयार झाले. त्यामुळे मॉन्सूनला चाल मिळाल्याने गुरुवारी (ता. २७) मॉन्सूनने श्रीलंकेसह मालदीव आणि कोमोरीन समुद्राच्या काही भागांत वाटचाल केली. यंदा मॉन्सून नियमित वेळेच्या (१ जून) आधी ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मोसमी वाऱ्यांसाठी पोषक स्थिती नसल्याने, मॉन्सूनची आगमन लांबले होते.  हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.  केरळात जोरदार पाऊस  आता जवळपास आठवडाभरानंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय होऊ लागले आहेत. केरळ व लगतच्या समुद्रात ढग गोळा होत असून, पावसाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे येत्या चोवीस तासांत मॉन्सून केरळात दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com