मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून 

उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून (ता.२८) सुरू होणार आहे. पश्चिम राजस्थान व आसपासच्या भागातून मॉन्सून परत फिरण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.
monsoon express
monsoon express

पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून (ता.२८) सुरू होणार आहे. पश्चिम राजस्थान व आसपासच्या भागातून मॉन्सून परत फिरण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदा १७ मे पासून मॉन्सूनचा सुरू झालेला प्रवास फारसा न अडखळता वेगाने पुढे सरकत राहिला होता. केरळमध्ये एक जून रोजी दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात साधारणपणे ११ जूनच्या दरम्यान धडक दिली. त्यानंतर मराठवाड्यातील दक्षिण भागातून उत्तरेकडे सरकून प्रवास वेगाने सुरू झाला होता. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात संपूर्ण मॉन्सून व्यापल्यानंतर १४ जूननंतर उत्तरेकडे कूच केली होती. अवघ्या दहा दिवसात मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापून बारा दिवस आधीच वायव्य भागात २४ ते २५ जूनच्या दरम्यान दाखल झाला होता.  यादरम्यान राज्यासह, देशातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस पडला होता. शनिवार (ता.२६) देशात ९४५.७ मिलिमीटर म्हणजेच १०९ टक्के पावसाची नोंद झाली होती. यामध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, ईशान्य भारतातील नागालॅंड, मणिपूर, मिझोराम या राज्यांत सर्वत्र चांगला पाऊस झाला होता. आता मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. त्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.साधारणपणे एक सप्टेंबरच्या दरम्यान मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र, हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर रोजी मॉन्सून १७ सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू होणे अपेक्षित होते. त्यामुळे काही प्रमाणात हा प्रवास लांबल्याची स्थिती असून दहा ते बारा दिवस उलटूनही वारे फिरले नव्हते. आता राजस्थानात पोषक वातावरण तयार झाले आहे. त्याचबरोबर राज्यातही गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती देण्यास सुरुवात केली आहे. 

पोषक स्थिती सध्या पूर्व-पश्चिम राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या भागात पावसाची उघडीप असून उन्हाचा चटका वाढला होता. त्यामुळे पश्चिम राजस्थानमधील अजमेर येथे सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली होती, अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com