agriculture news in Marathi, Monsoon withdraw form country, Maharashtra | Agrowon

परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता.१६) महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे. दक्षिण भारतातील केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये ईशान्य मोसमी वारे ईशान्य मॉन्सून) सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. यंदा केरळमध्ये ८ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने चार महिन्यापेक्षा अधिक काळ देशाच्या विविध भागात मुक्काम केला. तर राजस्थानातून सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी परतीचा प्रवास सुरू करणाऱ्या मॉन्सूनने आठवडाभरातच परतीचा प्रवास पूर्ण केला आहे.  

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता.१६) महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे. दक्षिण भारतातील केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये ईशान्य मोसमी वारे ईशान्य मॉन्सून) सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. यंदा केरळमध्ये ८ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने चार महिन्यापेक्षा अधिक काळ देशाच्या विविध भागात मुक्काम केला. तर राजस्थानातून सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी परतीचा प्रवास सुरू करणाऱ्या मॉन्सूनने आठवडाभरातच परतीचा प्रवास पूर्ण केला आहे.  

वायव्य भारतात हवेच्या खालच्या थरात केंद्रभागी दाब अधिक असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती (ॲण्टी सायक्लोनीक सर्कुलेशन) तयार होऊन, पावसाची उघडीप असल्यानंतर राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे जाहीर करण्यात येते. सलग पाच दिवस पावसाची उघडीप, सकाळच्या वेळी हवेतील बाष्पाचे कमी झालेले प्रमाण, वाऱ्यांची बदलेली दिशा आदी निरीक्षणानंतर मॉन्सूनची देशाच्या विविध भागातील परतीची वाटचाल ठरते. महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्यानंतर देशभरातून मॉन्सून परतल्याचे, तसेच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे ईशान्य मॉन्सून सक्रिय झाल्याचे जाहीर केले जाते.

केरळमध्ये यंदा तब्बल आठवडाभर उशिराने दाखल होणाऱ्या मॉन्सूनची वाटचाल सुरुवातीपासून अडखळत झाली. १८ मे रोजी अंदमानात पोचलेल्या मॉन्सूनचा पुढील प्रवास लांबला. देवभुमी केरळात तब्बल आठवडाभर उशिराने ८ जून रोजी मॉन्सून दाखल झाला. अरबी समुद्रात तयार झालेल्या अतितीव्र ‘वायू’ चक्रीवादळाने मॉन्सूनची वाटचाल रोखून धरली. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावलाच, तसेच बाष्प ओढून नेल्याने पाऊसही लांबला.

साधारणत: ७ जूनपर्यंत तळ कोकणात पोचणारा मॉन्सून, १९७२ नंतर प्रथमच २० जून रोजी तळकोकणात पोचला. तसेच २५ जून रोजी वाऱ्यांनी राज्य व्यापले. त्यानंतर मजल दरमजल करत दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशिराने म्हणजेच १९ जुलै रोजी मॉन्सूनने देश व्यापला. मॉन्सून कालावधीत जून ते सप्टेंबर देशात ११० टक्के पाऊस पडला. ११९४ नंतर २५ वर्षानंतर देशात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. 

यंदाच्या हंगामात उशिराने झालेले आगमन, पावसाची प्रमाण, परतीची सुरुवात या सर्वच बाबतीतील विक्रम मोडले गेले. बुधवारी (ता. ९) राजस्थानातून माघारी फिरलेल्या मॉन्सूनचा आतापर्यंतच्या सर्वांत उशिराने परतीच्या प्रवास ठरला आहे. यापूर्वी १ ऑक्टोबर १९६१ मध्ये सर्वांत उशिराने माघारी फिरला होता. त्यानंतर २००७ मध्ये ३० सप्टेंबर रोजी राजस्थानातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता.

यंदा या दोन्ही वेळा चुकवून मॉन्सून सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी परतीच्या प्रवासाला निघाला. मॉन्सूनचा परतीचा प्रवास प्रचंड वेगाने झाला. आठवडाभरातच मॉन्सून संपुर्ण देशातून परतला. तब्बल सव्वा महिना उशिराने परतीवर निघालेल्या मॉन्सूनने दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या (१५ ऑक्टोबर) केवळ एक दिवस उशिराने देशाचा निरोप घेतला. दक्षिण भारतातील राज्यामध्ये ईशान्य मॉन्सून सक्रिय झाला असून, १५ डिसेंबरपर्यंत या राज्यांमध्ये ईशान्य मॉन्सून मुक्काम करेल.

गेल्या काही वर्षांतील मॉन्सूनची परतीची वाटचाल 

वर्ष राजस्थानातून माघार देशाचा निरोप
२०११ २३ सप्टेंबर २४ ऑक्टोबर
२०१२ २४ सप्टेंबर १८ ऑक्टोबर
२०१३ ९ सप्टेंबर २१ ऑक्टोबर
२०१४ २३ सप्टेंबर १८ ऑक्टोबर
२०१५ ४ सप्टेंबर १९ ऑक्टोबर
२०१६ १५ सप्टेंबर २८ ऑक्टोबर
२०१७ २७ सप्टेंबर २५ ऑक्टोबर
२०१८ २९ सप्टेंबर २९ ऑक्टोबर
२०१९ ९ ऑक्टोबर १६ ऑक्टोबर

 

इतर अॅग्रो विशेष
साखर निर्यातीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढकोल्हापूर : पावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ...
काजू उत्पादन ३० टक्क्यांनी घटणारसिंधुदुर्ग : जुलै, ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी,...
द्राक्ष बागांचे पंचनामे करताना दिशाभूलनाशिक  : द्राक्ष बागांचे पंचनामा केल्यास...
कृषी कौशल्य प्रशिक्षणांद्वारे उभी...केंद्र शासनाची प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना २....
गारठा वाढला; नगर येथे नीचांकी तापमानपुणे  : उत्तरेकडून येणारे थंड वारे,...
पावसाने द्राक्ष शेतीचे ९ हजार कोटींवर...पुणे : सततच्या पावसामुळे सर्व अवस्थांमधील द्राक्ष...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांना...कोल्हापूर: कर्नाटकने झोनबंदी केल्याने सीमाभागातून...
पीक नुकसानीचा अंतिम अहवाल लांबण्याची...पुणे : राज्यात अतिपावसामुळे झालेल्या पिकांच्या...
शासकीय खरेदीसाठी उडीद, सोयाबीनची...परभणी: किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत...
राज्यात बहुतांंश भागांत तापमान २०...पुणे : राज्यात दोन दिवसांपासून किमान तापमान कमी...
पावसाचा सोयाबीन उत्पादकांना २२ हजार...पुणे : राज्यातील खरिपात दुसरे महत्त्वाचे पीक...
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला...पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा...
जन्मभूमी रामलल्लाचीच; 'अयोध्या' प्रकरणी...नवी दिल्ली : भारतवर्षाचा राजकीय भूगोल बदलून...
मराठवाड्यातील उपयुक्‍त पाणीसाठा ७१ टक्‍...औरंगाबाद  : संपूर्ण मराठवाड्यात ऑक्‍टोबर...
कांदा साठवणुकीच्या संदर्भात प्रशासन...नाशिक : कांदा दर नियंत्रणासाठी निर्यातबंदी नंतर...
हळद पावडर उद्योगात तयार केली ओळखसांगलीची बाजारपेठ हळकुंड आणि हळद पावडरीसाठी देश-...
शेतीपूरक व्यवसायासाठी मिळणार अनुदानपुणे ः शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-...
शेती, शिक्षण अन ग्रामविकासामध्ये...समानता, स्वातंत्र्य आणि सहानुभूतीमुळेच व्यक्तीचा...
चक्रीवादळे, मुसळधारेने ‘भाता’चे कंबरडे...रत्नागिरी : राज्यातील आठ विभागांपैकी पाच विभागांत...
‘बुलबुल’ चक्रीवादळामुळे पूर्व, ईशान्य...पुणे: बंगालच्या उपसागरातील ‘बुलबुल’ अतितीव्र...