Agriculture news in Marathi Monsoon withdraws from Maharashtra | Page 3 ||| Agrowon

मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) महाराष्ट्राचा निरोप घेतला आहे. गुरुवारी (ता. १४) उर्वरित मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणासह महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) महाराष्ट्राचा निरोप घेतला आहे. गुरुवारी (ता. १४) उर्वरित मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणासह महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर तब्बल ४ महिने ९ दिवस मुक्काम करून मॉन्सून परतला आहे.

यंदा दोन दिवस आधीच राज्यात दाखल झालेल्या मॉन्सूनने एक दिवस आधीच महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार ७ जून ही महाराष्ट्रातील आगमनाची व १५ ऑक्टोबर ही मॉन्सूनच्या महाराष्ट्रातून माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख आहे. यंदा मॉन्सूनने ५ जून रोजी महाराष्ट्रात हजेरी लावली. त्यानंतर १० जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला.  

गुरुवारी (ता. १४) मॉन्सूनच्या परतीची सीमा कोहिमा, सिलचर, कृष्णनगर, बारीपाडा, मालकांगिरी, नालगोंडा, बागलकोट, वेंगुर्ला अशी होती. ईशान्य भारताचा काही भाग, पूर्व किनारपट्टी, गोवा आणि दक्षिण भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांशी भागातून मॉन्सून परतला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  

हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख आहे. यंदा तब्बल १९ दिवस उशिराने ६ ऑक्टोबर रोजी परतीचा प्रवास सुरू केला होता. ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील विदर्भाच्या काही भागातून, तर १२ ऑक्टोबर रोजी संपूर्ण विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागातून मॉन्सून परतला होता.


इतर अॅग्रो विशेष
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...
सत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या ...पुणे ः राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय...
‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी ...सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क...
शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३... नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी...
दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात...सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न...
स्टॉक लिमिटला नकार;  सोयाबीन बाजाराला...पुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार...
भाजीपाला,पूरक उद्योगातून महिलांची आघाडीमिरजोळी(ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) गावातील उपक्रमशील...
तुर्कांबाद खराडीत करारावर बटाटा...औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील...
शेतकऱ्यांनो एकरकमी भरा अर्धेच वीजबिल ः...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण...
राज्याच्या किमान तापमानात घट पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आकाश...
शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे -...लातूर ः आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची...
शिंदीच्या झाडांचे आता जिओ टॅगिंग  नीरा...नागपूर ः राज्य शासनाने नीरा देणाऱ्या शिंदीच्या...
कंटेनर भाड्यात पाच पट वाढ नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात...
विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कापड उद्योगाला खुपतोय कापसाचा दर पुणे : तमिळनाडूतील राजकीय पक्ष तसेच कापड...