जळगाव बाजार समितीत मुगाचे दर टिकून

जळगाव बाजार समितीत मुगाचे दर टिकून
जळगाव बाजार समितीत मुगाचे दर टिकून

नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवडाभरात ११५३ क्विंटल मुगाची आवक झाली. मुगाला प्रतिक्विंटल ४००० ते ६४०० रुपये दर मिळाला. ज्वारी, उडदाचीही आवक आता बऱ्यापैकी सुरू झाली आहे.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या महिनाभरापासून मुगाची व उडदाची बऱ्यापैकी आवक सुरू आहे. आठवडाभरात गावरान ज्वारीची ४८७ क्विंटलची आवक होऊन २२०० ते ३२०० रुपये दर मिळाला. तर बाजरीची २३८ क्विंटलची आवक होऊन १७०० ते १९०० रुपये दर मिळाला. 

उडदाची ३५३ क्विंटलची आवक होऊन ५२०० ते ५७५१ रुपये दर मिळाला. गव्हाची फारशी आवक होताना दिसत नाही. गेल्या आठवड्याभरात गावाची अवघ्या १७ क्विंटल आवक होऊन रुपये १९०० ते २४०० दर मिळाला. तर सोयाबीनची १५७ क्विंटलची आवक होऊन ३७०० रुपये दर मिळाला. आठवडाभरात गूळ डागाची अवघी ३४८ क्विंटल आवक होऊन २८०० ते ४८०० रुपयांचा दर मिळाला. 

नगर बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची फारशी आवक होताना दिसत नाही. भाजीपाल्याच्या आवकेत सातत्याने चढ-उतार होत आहे. आठवडाभरात कोबी, फ्लॉवर, भेंडी, वांगी, टोमॅटो, बटाटा, गवार, दोडका, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, शेवगा, मेथी, पालक आदी भाज्यांना चांगली मागणी राहिली, असे बाजार समितीचे सचिव व विषय यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com