Agriculture news in Marathi, Moog rates in Khandesh are steady, waiting for arrival Udid | Agrowon

खानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत. मुगाला जळगाव व चोपडा (जि. जळगाव) येथील बाजारात प्रतिक्विंटल ५००० ते ६३५० रुपये दर मिळाले. जळगावच्या बाजारात गेल्या आठवड्यात प्रतिदिन सरासरी ७०० क्विंटल आवक झाली. उडदाची कुठेही आवक सुरू झालेली नसल्याची माहिती मिळाली. 

जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत. मुगाला जळगाव व चोपडा (जि. जळगाव) येथील बाजारात प्रतिक्विंटल ५००० ते ६३५० रुपये दर मिळाले. जळगावच्या बाजारात गेल्या आठवड्यात प्रतिदिन सरासरी ७०० क्विंटल आवक झाली. उडदाची कुठेही आवक सुरू झालेली नसल्याची माहिती मिळाली. 

जळगाव जिल्ह्यात मुगासाठी चोपडा, मुक्ताईनगर, अमळनेर, जळगाव या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. धुळ्यात धुळे, शिरपूर व दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारात शहादा व नंदुरबार बाजार समितीमध्ये मुगाची आवक होते. चोपडा व अमळनेर येथील बाजारातही आवक सुरू आहे. परंतु, जळगावच्या तुलनेत तेथे यंदा आवक कमी आहे. 

गेल्या आठवड्याच्या सुरवातीला जळगावात १००० क्विंटल मुगाची आवक झाली. आवक औरंगाबादमधील सिल्लोड, सोयगाव, जालना व बुलडाणा या भागांतील व्यापाऱ्यांकडून अधिक होत आहे. शेतकऱ्यांकडूनही आवक सुरू आहे. परंतु, ती हवी तशी नाही. अधिक ओलावा असलेल्या मुगाला प्रतिक्विंटल ५००० व दर्जेदार मुगाला ६३५० रुपये प्रतिक्विंटलचा दर जळगावात मिळाला. चोपडा बाजार समितीत प्रतिदिन ४०० क्विंटल आवक झाली. तर अमळनेरातही प्रतिदिन ७०० क्विंटल आवक झाली. अमळनेर येथेही कमाल ६३५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. नंदुरबार व धुळे येथील बाजारातही आवक सुरू आहे. तेथे या आठवड्यात आवक वाढू शकते. कारण, या भागात मूग काढणीत गेल्या सात-आठ दिवसांपासून व्यत्यय येत होता. 

सध्या पाऊस थांबल्याने मूग काढणी वेगात सुरू आहे. धुळे येथील बाजारात प्रतिदिन ८०० क्विंटल आवक झाली. तर शिरपूर येथेही प्रतिदिन ८०० क्विंटल आवक झाली. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदामधील मध्य प्रदेशच्या सीमेलगतचे शेतकरी आपला मूग विक्रीसाठी मध्य प्रदेशातील बडवानी येथे पाठवीत आहेत. तेथे कमाल ६६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती मिळाली. 

जळगाव जिल्ह्यात यावल, रावेर, जामनेर येथील बाजारात मुगाची फारशी आवक सुरू नसल्याचे सांगण्यात आले. उडदाची मळणी किंवा काढणी अद्याप अनेक भागांत सुरू झालेली नाही. काळ्या कसदार जमिनीत ही काढणी या आठवड्यात सुरू होऊ शकते. अर्थातच कुठेही बाजारात आवक सुरू झालेली नाही. यामुळे उडदाच्या दरांचा कलही अस्पष्ट आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशीत वातावरण राहिल्यास उडदाचा दर्जाही चांगला असेल आणि मळणीला वेग येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


इतर बाजारभाव बातम्या
हिंगोलीत हरभरा ४१०० ते ४३५८ रुपये...हिंगोली : ‘‘हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
राज्यात कांदा १०० ते ११०० रुपये क्विंटल पुणे : कोरोनामुळे विस्कळीत झालेली शेतमालाची...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये शेवगा ४ ते ६ हजार रुपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ...
विदर्भात तूरीचे दर पोचले सहा हजारांवरनागपूर ः तूरीच्या दरात अचानक तेजी नोंदविण्यात आली...
कोल्हापुरात वांगी, टोमॅटोच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत वांगी, टोमॅटो,...
सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूला उठावसोलापूर ः  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
पुण्यात टोमॅटो, शेवग्याच्या दरात वाढपुणे   ः गुलटेकडी येथील पुणे कृषी...
हिंगोलीत हळद प्रतिक्विंटल ५००० ते ६०००...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
लॉकडाउन शिथिलतेनंतर विदर्भात केळी दर...नागपूर ः लॉकडाउनपूर्वी ३०० ते ३७५ रुपये असा दर...
बाजरीची आवक घटली, दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील बाजार समित्यांमध्ये बाजरीची...
राज्यात मिरची १५०० ते ५००० रुपये...सांगलीत प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये सांगली ः...
जळगावात गवार ३२०० ते ४६०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढ, दरही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
औरंगाबादेत लिंबूच्या दरात किंचित सुधारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, टोमॅटो, ढोबळी मिरचीला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत दहा ट्रकने...पुणे ः कोरोना टाळेबंदीनंतर सुरू झालेल्या पुणे...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची १००० ते ३२००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत जांभूळ ८००० ते १२००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
पुण्यातील फूलबाजारात फुलांची अत्यल्प आवकपुणे : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन...