परभणी ः मूग, उडदाच्या पीक स्पर्धेसाठी शनिवारपर्यंत अर्ज करावा

परभणी ः कृषी विभागातर्फे खरीप हंगामापासून पूर्वीच्या पीक स्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणून नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहे.
 for the Moog, Udid crop competition Apply by Saturday
for the Moog, Udid crop competition Apply by Saturday

परभणी ः कृषी विभागातर्फे खरीप हंगामापासून पूर्वीच्या पीक स्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणून नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहे. इच्छुक शेतकऱ्यांना मूग, उडीद या पिकांसाठी शनिवार (ता.३१ जुलै) आणि तूर, सोयाबीन या पिकांसाठी ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करावे लागतील.

पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. प्रयोगशील शेतकऱ्यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गैारव केल्यास त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच ते अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील, हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येतील. 

स्पर्धेचे निकष...

पिकाची निवड करताना पीकनिहाय तालुक्यातील संबंधित पिकाखालील क्षेत्र किमान १००० हेक्टर असावे. पीक स्पर्धेसाठी किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटासाठी ५ राहील. लाभार्थ्यांच्या शेतावर त्या पिकाखालील किमान १० गुंठे (आर )क्षेत्रावर सलग लागवड आवश्यक आहे. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी ५ व आदिवासी गटासाठी ४  राहील. पीक कापणीसाठी प्लॉटची निवड ही सांख्यिकीय विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करण्यात येईल. प्रवेश शुल्क ३०० रुपये राहील. सहभागी होण्यासाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी केले.

विजेत्यांसाठी बक्षिसे...

तालुका स्तर प्रथम ५ हजार रुपये,व्दितीय ३ हजार रुपये, तृतीय २ हजार रुपये
जिल्हा स्तर प्रथम १० हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये, तृतीय ५ हजार रुपये.
विभाग स्तर प्रथम २५ हजार रुपये, व्दितीय २० हजार रुपये, तृतीय १५ हजार रुपये.
राज्य स्तर प्रथम ५० हजार रुपये, व्दितीय ४० हजार रुपये, तृतीय ३० हजार रुपये. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com