agriculture news in Marathi moong procurement will start from October Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मूग खरेदी एक ऑक्टोबरपासून

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

राज्यात १ ऑक्टोबर २०२० पासून मूग खरेदीला सुरुवात होणार असून ही खरेदी प्रक्रिया पुढे ९० दिवस चालणार आहे.

मुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे ३१ ऑगस्ट २०२० ला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून राज्यात १ ऑक्टोबर २०२० पासून मूग खरेदीला सुरुवात होणार असून ही खरेदी प्रक्रिया पुढे ९० दिवस चालणार आहे, अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

१५ सप्टेंबरपासून मूग खरेदीसाठीची नोंदणी सुरु झाली आहे. विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे-२९, मार्केटिंग फेडरेशन-१०५, महाएफपीसी-४७ खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. आत्तापर्यंत २३० शेतकऱ्यांनी मुगाची नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी असे आवाहनही पणन मंत्री श्री. पाटील यांनी केले.

नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार मूग खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे, त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. हंगाम २०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत मुगाला ७ हजार १९६ असा हमीभाव जाहीर केला आहे. सर्व मूग खरेदी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उकाडा वाढण्यास सुरूवात  पुणे ः परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार...
पीकविमा परतावा तात्काळ द्या, अन्यथा...अमरावती : जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (ॲग्रिकल्चर...
कापूस उत्पादनात मोठी घट, पीक परवडेनाजळगाव ः अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली....
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
‘कडकनाथ’ कुक्कुटपालनात निर्माण केल्या...आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १००...
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...