agriculture news in marathi Moong, Urd arrivals not as expected in Aurangabad APMC | Agrowon

औरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्य

संतोष मुंढे
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व उडिदाची आवक नगण्य प्रमाणात होत आहे. गत आठवड्यात केवळ एकदाच नव्या बाजरीची आवक झाली. 

औरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व उडिदाची आवक नगण्य प्रमाणात होत आहे. गत आठवड्यात केवळ एकदाच नव्या बाजरीची आवक झाली. गत हंगामातील हरभरा, ज्वारी, मका, तुरीची आवकही बाजार समितीत कमी अधिक प्रमाणात होत असल्याचे बाजारसमितीच्या सूत्रांनी सांगितले.

येथील बाजार समितीत गत सप्ताहात बाजरी, उडीद व मुगाची आवक व दरात चढ-उतार पाहायला मिळाला. याची आवक औरंगाबाद तालुक्यातूनच होत आहे. बाजार समितीत बाजरीची ४८ ते १०३ क्विंटल दरम्यान आवक झाली. जरीला १००० ते १३०० रुपये क्विंटल दरम्यान दर मिळाला. उडिदाची आवक २ ते ८ क्विंटल दरम्यान राहिली. उडिदाला ४ हजार ते ६५०० रुपये क्विंटल दरम्यान दर मिळाला. हरभऱ्याची आवक २ ते ११ क्विंटल दरम्यान झाली.

हरभऱ्याला ३५०० ते ५५५१ रुपये क्विंटल दरम्यान दर मिळाला. मुगाची आवक ६ ते ३८ क्विंटल दरम्यान राहिली. मुगाला ३५०० ते ६५०० रुपये क्विंटल दर मिळाला. मक्याची आवक १२ ते १५ क्विंटल झाली. मक्याचे दर १००० ते १२३० रुपये क्विंटल राहिले. तुरीची आवक गत आठवड्यात तीन वेळा झाली. २ ते ३ क्विंटल दरम्यान आवक झालेल्या तुरीला ३५०० ते ५५०० रुपये क्विंटल दर मिळाला. ज्वारीची आवक १५ ते ७१ क्विंटल दरम्यान झाली. ज्वारीचे दर १३०० ते २३०० रुपये  क्विंटल दरम्यान राहिले.

नव्या बाजरीची २४ सप्टेंबरला एकदाच आवक झाली. या नव्या बाजरीला १४०० रुपये क्विंटल दर मिळाला होता. उडीद व मुगाच्या आवकेचे प्रमाण नगण्य असून मुगाचा हंगाम संपल्यात जमा आहे. उडिदाची आवकही अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. नव्या मका आवकेची प्रतीक्षा असून बाजार समितीत गत रब्बी हंगामातील ज्वारी, हरभऱ्यासह गत हंगामातील तुरीची कमी-अधिक प्रमाणात आवक होत आहे. त्यांचे दर जवळपास स्थिर असल्याचे चित्र आहे.


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात सोयाबीन ३००० ते ४२०० रुपयेअकोल्यात ३३०० ते ४१२५ रुपये दर अकोला ः...
नाशिकमध्ये वांगी सरासरी ८५०० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
राज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...