मोर मध्यम प्रकल्पाच्या कालवा दुरूस्तीकडे दुर्लक्ष

हिंगोणा, जि. जळगावः सातपुडा पर्वतातील मोर मध्यम प्रक्ल्प तालुक्यासाठी महत्त्वाचा आहे. परंतु, कालवा, पाटचाऱ्यांची दैना झाली आहे. त्यामुळे त्याच्या पाण्याचा पुरेसा उपयोग होत नसल्याची स्थिती आहे.
Of the Mor medium project Ignore canal repairs
Of the Mor medium project Ignore canal repairs

हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर मध्यम प्रक्ल्प तालुक्यासाठी महत्त्वाचा आहे. परंतु, कालवा, पाटचाऱ्यांची दैना झाली आहे. त्यामुळे त्याच्या पाण्याचा पुरेसा उपयोग होत नसल्याची स्थिती आहे.

मोर प्रकल्पाचे पाणी पाटचाऱ्यांमध्ये सोडण्यासाठी १९७८ मध्ये कालवा तयार करण्यात आला. अनेक वर्षे खोदकाम करण्यात त्या वेळी मजबूत, आधुनिक खोदकामाची यंत्रणा नव्हती. यामुळे कालवा तयार करण्यासाठी अनेक वर्षे लागली. या कालव्याला ४० वर्षे झाली. परंतु, पाटचाऱ्या व कालव्याची दुरूस्ती पाटबंधारे विभागाला करावी लागली नाही. 

कालव्यातील पाण्याचे नियोजन व इतर कार्यवाहीसाठी ठिकठिकाणी कर्मचारी नियुक्त केले होते. परंतु, आता कर्मचारीदेखील नाहीत. पूर्वी शेतकरी कालव्यातून इंधनाच्या पाणी उपसा यंत्रणाने पाण्याचा उपसा करायचे. सिंचनाखालील क्षेत्रही बऱ्यापैकी होते. दर १५ दिवसांआड कालव्याला पाणी सोडले जायचे. परंतु, कालव्यासाठी आता कर्मचारीदेखील नाहीत. सर्व नियोजन चुकले आहे. 

पाटचारीभोवती झुडपे वाढली आहेत. कालव्याचा उपयोगही शेतकऱ्यांना होत नाही. यामुळे पाण्याचा उपयोग काय, असा प्रश्‍न शेतकरी करतात. या कालव्यासह पाटचाऱ्यांची दुरुस्ती केली, तर सिंचनाखालील क्षेत्र वाढेल. प्रकल्पातील पाण्याचा उपयोग होईल. रब्बी पिके जोमात येतील व शेतकऱ्यांना लाभ होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com