Agriculture news in marathi Of the Mor medium project Ignore canal repairs | Agrowon

मोर मध्यम प्रकल्पाच्या कालवा दुरूस्तीकडे दुर्लक्ष

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर मध्यम प्रक्ल्प तालुक्यासाठी महत्त्वाचा आहे. परंतु, कालवा, पाटचाऱ्यांची दैना झाली आहे. त्यामुळे त्याच्या पाण्याचा पुरेसा उपयोग होत नसल्याची स्थिती आहे.

हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर मध्यम प्रक्ल्प तालुक्यासाठी महत्त्वाचा आहे. परंतु, कालवा, पाटचाऱ्यांची दैना झाली आहे. त्यामुळे त्याच्या पाण्याचा पुरेसा उपयोग होत नसल्याची स्थिती आहे.

मोर प्रकल्पाचे पाणी पाटचाऱ्यांमध्ये सोडण्यासाठी १९७८ मध्ये कालवा तयार करण्यात आला. अनेक वर्षे खोदकाम करण्यात त्या वेळी मजबूत, आधुनिक खोदकामाची यंत्रणा नव्हती. यामुळे कालवा तयार करण्यासाठी अनेक वर्षे लागली. या कालव्याला ४० वर्षे झाली. परंतु, पाटचाऱ्या व कालव्याची दुरूस्ती पाटबंधारे विभागाला करावी लागली नाही. 

कालव्यातील पाण्याचे नियोजन व इतर कार्यवाहीसाठी ठिकठिकाणी कर्मचारी नियुक्त केले होते. परंतु, आता कर्मचारीदेखील नाहीत. पूर्वी शेतकरी कालव्यातून इंधनाच्या पाणी उपसा यंत्रणाने पाण्याचा उपसा करायचे. सिंचनाखालील क्षेत्रही बऱ्यापैकी होते. दर १५ दिवसांआड कालव्याला पाणी सोडले जायचे. परंतु, कालव्यासाठी आता कर्मचारीदेखील नाहीत. सर्व नियोजन चुकले आहे. 

पाटचारीभोवती झुडपे वाढली आहेत. कालव्याचा उपयोगही शेतकऱ्यांना होत नाही. यामुळे पाण्याचा उपयोग काय, असा प्रश्‍न शेतकरी करतात. या कालव्यासह पाटचाऱ्यांची दुरुस्ती केली, तर सिंचनाखालील क्षेत्र वाढेल. प्रकल्पातील पाण्याचा उपयोग होईल. रब्बी पिके जोमात येतील व शेतकऱ्यांना लाभ होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
 


इतर बातम्या
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
आदिवासी बेरोजगारांसाठी औषधी वनस्पतीवरील...कर्जत, जि. रायगड : आदिवासींच्या उत्कर्षासाठी...