वीजबिले माफीसाठी कोल्हापुरात मोर्चा

घरगुती वीजबिल माफ व्हावे, या मागणीकरिता ‘आम्ही वीजबिल भरणार नाही’ कृती समितीतर्फे काढण्यात आलेल्या वाहन फेरीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी (ता. ७) धडक दिली. दुचाकी, ट्रक, रिक्षा, ट्रॅव्हल बसमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
Morcha in Kolhapur for waiver of electricity bills
Morcha in Kolhapur for waiver of electricity bills

कोल्हापूर : घरगुती वीजबिल माफ व्हावे, या मागणीकरिता ‘आम्ही वीजबिल भरणार नाही’ कृती समितीतर्फे काढण्यात आलेल्या वाहन फेरीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी (ता. ७) धडक दिली. दुचाकी, ट्रक, रिक्षा, ट्रॅव्हल बसमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

कोरोनाच्या संचारबंदीत सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला काम नव्हते. अनेकांचे रोजगार बंद झाले. घरखर्च चालवण्यासाठी त्यांना उसनवारी करावी लागली. वीजबिल भरण्याची त्यांची क्षमता नसल्याने वीजबिल माफ व्हावे, अशी समितीची मागणी आहे. सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप समितीचा आहे. सरकारला या प्रश्‍नी जागे करण्यासाठी समितीने वाहन फेरीचे आयोजन केले. गांधी मैदान येथून फेरीला प्रारंभ झाला.

फेरीत कृती समितीचे निवास साळोखे, सुभाष जाधव, विक्रांत पाटील-किणीकर, प्रा. जालंदर पाटील, बाबा इंदुलकर, सुरेश जरग, बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, प्रकाश घाटगे, राकेश गायकवाड, अजय अकोळकर सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com