पीक पंचनाम्याच्या मागणीसाठी पुसदमध्ये मोर्चा

संततधार पाऊस, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात अशी मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बैलगाडीसह आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
Morcha in Pusad demanding crop panchnama
Morcha in Pusad demanding crop panchnama

पुसद, जि. यवतमाळ : संततधार पाऊस, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात अशी मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बैलगाडीसह आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

गेले सहा महिने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे शेतीक्षेत्रही प्रभावित झाले. शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीत अडचणी आल्या. जिल्हा बंदी, तालुका बंदी असल्याने ज्या भागात शेतमालाला ज्यादा दर आहे त्या भागात जाऊन विक्री करणेही शक्य झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात शेतमालाची विक्री करावी लागली.

परिणामी आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर त्यानंतरच्या काळात नवी आव्हाने निर्माण झाली. निकृष्ट दर्जाच्या बियाणे पुरवठ्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला उगवण विषयक समस्या होती. या कारणामुळे शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. त्यानंतर संततधार पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला. त्याच्या नियंत्रणासाठी सरसावलेल्या शेतकऱ्यांचा कीडनाशकांवर मोठा खर्च झाला.

आता परिपक्व अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकाला संततधार पावसामुळे कोंब फुटले. काही भागात कपाशीची बोंडे सडली आहेत. शेतकऱ्यावरील संकटाची मालिका अशाप्रकारे कायम असल्याने या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शासनाने तात्काळ पावले उचलावी, त्याकरिता सरसकट मदतीचे धोरण अवलंबिण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी वसंतराव नाईक चौकातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

मोर्चा गांधी चौकात पोहोचल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठवण्यात आले. मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वास लांडगे, नाना गाडेकर, केशव खंदारे, नामदेव महाजन, रमेश लहाडे, जी. जी. ठाकूर, प्रमोद दीक्षित, पिंटू जाधव, रामराव राठोड, नारायण अंभोरे, संदीप जाधव, शांतशील जाधव, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com