एफआरपीसाठी आज ‘स्वाभिमानी’ साखर आयुक्तालयावर धडकणार

एफआरपीसाठी आज ‘स्वाभिमानी’ साखर आयुक्तालयावर धडकणार
एफआरपीसाठी आज ‘स्वाभिमानी’ साखर आयुक्तालयावर धडकणार

कोल्हापूर : उसाची एफआरपी तुकड्यांमध्ये न स्वीकारण्यावर ठाम असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (ता. २८) पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर हल्ला बोल मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता अलका टॉकीज जवळून मोर्चास प्रारंभ होणार आहे.  खासदार राजू शेट्टी यांच्या नेतत्वाखाली हा मोर्चा निघेल. कारखान्यानी एक रकमी एफआरपी अद्याप दिली नाही. यावर साखर आयुक्‍तालयाने कोणतीच कार्यवाही केली नाही. याचा जाब संघटनेच्या वतीने विचारला जाणार आहे. मोर्चातील संघटनेचे राज्यातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. हे आंदोलन आक्रमक असेल, अशी माहिती स्वाभिमानीच्या सूत्रांनी दिली. या मोर्चाविषयी माहिती देताना खासदार शेट्टी म्हणाले, की राज्यात साखर करखाने सुरू होऊन जवळपास अडीच महिने झाले आहेत. तरी, कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिलेली नाही. आम्हाला तुकड्यात मिळणारी एफआरपी मान्य नाही. जोपर्यंत एफआरपीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. उसाला एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी गेले पंधरा दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत असल्याचे सांगून खासदार शेट्टी म्हणाले, की राज्यात सध्या ५ हजार ५०० कोटींची एफआरपी थकीत आहे. उत्तर प्रदेशात ९ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. केंद्र सरकार एफआरपीच्या मुद्द्यावर निर्णय घेताना दिसत नाही. त्याउलट शेतकऱ्यांची फसवणूकच सुरू आहे. आर्थिक स्थिती नसल्याचे कारण सांगणाऱ्या कारखान्यांवर सरकारने दबाव टाकण्याची गरज होती. श्री. शेट्टी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील भाजपच्या बूथ कमिटीतील कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. एफआरपी दिल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. पण, ही माहिती २०१५-१६च्या हंगामाची आहे. २०१७ पासून कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिलेली नाही. राज्यात सुमारे १८० साखर कारखाने सुरू आहेत. त्यापैकी ११ साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली आहे. उर्वरित साखर कारखान्यांनी अद्यापही एकरकमी एफआरपी दिलेली नाही यामुळे आम्ही हे आंदोलन करीत आहोत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com