राज्यात चोवीस तासात ९१ जणांचा मृत्यू; ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात रविवारी (ता.) १९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४ झाली आहे.
राज्यात चोवीस तासात ९१ जणांचा मृत्यू; ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
राज्यात चोवीस तासात ९१ जणांचा मृत्यू; ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई : राज्यात रविवारी (ता.) १९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४ झाली आहे. दरम्यान, रविवारी कोरोनाच्या ३००७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४३ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. दरम्यान, रविवारी सकाळपर्यंतच्या गेल्या चोवीस तासात राज्यात ९१ जणांचा मृत्यू झाला असून त्यात सर्वाधिक मृत्यू ठाणे, मुंबई येथे झाले आहेत. रविवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ५१ हजार ६४७ नमुन्यांपैकी ८५ हजार ९७५ नमुने पॉझिटिव्ह (१५.५८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार ४६३ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७ हजार ६५४ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ५०४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ९१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी झाली आहे. रविवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७१ (मुंबई ६१, उल्हासनगर ५, मीरा-भाईंदर ४, पालघर १), नाशिक- १ (नाशिक १), पुणे- १४ (पुणे ६, सोलापूर ८), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २), औरंगाबाद-१ (जालना १), अकोला-१ (अकोला मनपा १). इतर राज्य- १ (पश्चिम बंगाम मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे.). रविवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६४ पुरुष तर २७ महिला आहेत. नोंद झालेल्या ९१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४६ रुग्ण आहेत तर ४१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ९२ रुग्णांपैकी ६७ जणांमध्ये (७३.६टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०६० झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com