पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून अनेक भागांत पावसाची संततधार सुरू होती. बुधवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंत नीरा देवघर, वडीवळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
more than 80% water storage in six dams in Pune district
more than 80% water storage in six dams in Pune district

पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून अनेक भागांत पावसाची संततधार सुरू होती. बुधवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंत नीरा देवघर, वडीवळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहत असून धरणांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे.

आत्तापर्यंत जिल्ह्यातील सहा धरणे भरली आहेत. यामध्ये खडकवासला, कळमोडी, वीर ही तीन धरणे शंभर टक्के भरली असून तीन धरणांत ८० टक्केपेक्षा अधिक भरली आहेत. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली आणि उत्तरेकडील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू होती. मंगळवारीही पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २८ तर, मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वीस, भाटघर, पिंपळगाव जोगे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पंधरा मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर पाणशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४, वरसगाव बारा, गुंजवणी ११, पवना ८, आंध्रा ९, कळमोडी १०, माणिकडोह ८, डिंभे ५, भामा आसखेड ७ मिलिमीटर पाऊस पडला. उतरपूर्वेकडील तालुक्यात पावसाच्या अधूनमधून सरी बरसत होत्या. त्यामुळे धरणातील पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ होत आहे.

जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील गुंजवणी, आंध्रा, कासारसाई ही धरणे ८० टक्केवर भरली आहेत. तर वडज, नीरा देवघर, भाटघर,नाझरे, भामाआसखेड, वडिवळे, पवना, मुळशी, वरसगाव, पानशेत ही धरणे ५० टक्केवर भरली आहेत. काही धरणांत अजूनही ५० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. यामध्ये माणिकडोह, येडगाव, डिंभे, घोड, विसापूर, चासकमान, टेमघर या धरणांचा समावेश आहे. धरणातील पाणी पातळीत अजूनही वाढ होत असल्याने धरणातून सांडवा, डावा कालवा आणि उजव्या कालव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. बुधवारी (ता. १२) सकाळी वीर धरणांतून ८०० क्सुसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com