agriculture news in Marathi, more than 90 lacs applications for crop insurance, Maharashtra | Agrowon

पीकविमा योजनेसाठी ९० लाखांहून अधिक अर्ज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे प्रमाण यंदा गेल्या वर्षीपेक्षा वाढले आहे. मंगळवारी (ता.३१) रात्री बारा वाजेपर्यंत ९० लाखांहून अधिक अर्ज भरण्यात आले असून, शेतकऱ्यांची अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे.  

‘‘मंगळवारी दुपारपर्यंत राज्यातील ७६ लाख शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले. त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत चार लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरले. रात्री बारा वाजेपर्यंत हा आकडा ९० लाखांच्या पुढे गेला. यंदा ऑनलाइन अर्ज भरण्यात शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे,’’ असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे प्रमाण यंदा गेल्या वर्षीपेक्षा वाढले आहे. मंगळवारी (ता.३१) रात्री बारा वाजेपर्यंत ९० लाखांहून अधिक अर्ज भरण्यात आले असून, शेतकऱ्यांची अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे.  

‘‘मंगळवारी दुपारपर्यंत राज्यातील ७६ लाख शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले. त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत चार लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरले. रात्री बारा वाजेपर्यंत हा आकडा ९० लाखांच्या पुढे गेला. यंदा ऑनलाइन अर्ज भरण्यात शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे,’’ असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

 आपले सरकार सेवा केंद्र, बँक, विमा कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी यांच्या मदतीने राज्याच्या विविध भागांमध्ये मंगळवारी रात्री बारावाजेपर्यंत अर्ज भरले जात होते. सर्व्हरवर ताण आल्यामुळे बुधवारी देखभालीसाठी ऑनलाइन प्रणाली काही तास बंद ठेवण्यात आली होती. 

राष्ट्रीयीकृत, व्यापारी व जिल्हा बँकांनी अनेक शेतकऱ्यांचा विमा हप्ता रोख, ऑनलाइन, डिमांड ड्रॉफ्टद्वारे जमा करून घेतला आहे. त्यानंतर विमा हप्ता भरलेले अर्ज अपलोड करण्यासाठी वेबसाइट चालू ठेवण्यात आलेली आहे. त्याचा अॅक्सेस मात्र शेतकऱ्यांना नसेल. 

 गेल्या हंगामात राज्यात १८.८९ लाख कर्जदार तर ६४.६९ लाख बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते. यंदा बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी निश्चित किती अर्ज भरले याची माहिती दुपारी चार वाजेपर्यंत कृषी विभागाच्या सांख्यिकी कक्षाकडे आलेली नव्हती.


इतर अॅग्रो विशेष
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...