आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार विद्यापीठांनी घडविले : मुनगंटीवार

आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते शेतकरी घडविण्याऐवजी आजवर केवळ नोकरदार घडले. त्यामुळेच कृषी विद्यापीठांची शिक्षण आणि कार्यपद्धती अशा दोन्हीत व्यापक बदलाची गरज माजी अर्थमंत्री तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली.
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार विद्यापीठांनी घडविले : मुनगंटीवार
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार विद्यापीठांनी घडविले : मुनगंटीवार

चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते शेतकरी घडविण्याऐवजी आजवर केवळ नोकरदार घडले. त्यामुळेच कृषी विद्यापीठांची शिक्षण आणि कार्यपद्धती अशा दोन्हीत व्यापक बदलाची गरज माजी अर्थमंत्री तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली.

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विभाजनाबाबत सुधीर मुनगंटीवार आग्रही आहेत. या संदर्भाने बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. कृषिप्रधान देशात पारंपारिक पीकपद्धतीवरच शेतकऱ्यांची अवलंबिता वर्षानुवर्षांपासून आहे. उत्पादनक्षम वाण, पूरक तंत्रज्ञान देण्यात विद्यापीठ अपयशी ठरली. त्यातच विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी एकच विद्यापीठ आहे. पूर्व विदर्भात पीकपद्धती, वातावरण तुलनेत वेगळं असताना या भागाकरिता स्वतंत्र विद्यापीठ असावे असा आमचा आग्रह आहे. सुरवातीला विद्यापीठ स्थापनेच्या कामाला गती होती. मराठवाडा कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू बी. वेंकटेश्‍वरलु यांनी विद्यापीठाबाबत सकारात्मक अहवाल देखील दिला आहे. जागा निश्चिती देखील अंतिम टप्प्यात होती. मात्र, सध्याच्या मुंगीच्या गतीने काम करणाऱ्या सरकारने गेल्या सरकारच्या काळातील निर्णयावर आकसपूर्ण बुद्धीने स्थगितीचा सपाटा लावला आहे. हे रडणारे सरकार असल्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा करणे देखील संयुक्तिक ठरणार नाही. मात्र त्यानंतर ही विद्यापीठ विभाजन नक्कीच होणार. त्याच्या पहिल्या टप्प्यात आम्ही या भागात कृषी महाविद्यालयाला मंजुरी मिळवत ते सुरू केले. आम्ही सत्तेत आल्यास निश्चितच कृषी विद्यापीठाचे विभाजन करून कृषी शिक्षण तसेच विद्यापीठांच्या कार्यपद्धतीत बदल यासाठी पुढाकार घेऊ असेही त्यांनी सांगितले. - ‘‘कृषी विद्यापीठांनी आजवर आदर्श शेतकरी घडविले नाही, केवळ नोकरदार घडवले. त्यामुळे कृषी विद्यापीठांच्या शिक्षणक्रमात आमूलाग्र बदलाचा मुद्दा मांडला आहे. कृषिमंत्री नसतानाही मी हे बदल सुचविले होते.’’ - सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री तसेच आमदार. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com