agriculture news in marathi More than half of the Gram Panchayat elections in Solapur district in December | Agrowon

सोलापूर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतीच्या डिसेंबरमध्ये निवडणुका

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

सोलापूर ः जून ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ६५८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम डिसेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

सोलापूर ः जून ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ६५८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम डिसेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचा आदेश दिला आहे. १ डिसेंबर रोजी प्रारूप यादी प्रसिद्धी होईल. त्यावर ७ डिसेंबरपर्यंत तक्रारी व हरकती मागवण्यात येतील आणि १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होईल. 

निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये विधानसभा मतदार यादीत संबंधित ग्रामपंचायतीचा समाविष्ट असलेल्या एकूण मतदारांची संख्या अधिक त्या ग्रामपंचायतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या समान असल्याची खात्री करण्याचे आदेश दिले आहेत. 

लेखनिकाच्या काही चुका, दुसऱ्या प्रभागातील चुकून समावेश केलेले मतदार, संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही ग्रामपंचायतीच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली, तर अशा मतदारांची नावे ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार यादीत समाविष्ट करावी, मतदार यादीतील दुबार नावे शोधावीत, मृत अथवा स्थलांतरित असल्यास योग्य तो निर्णय घ्यावा. प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर ग्रामपंचायतीच्या नावासह प्रसिद्धी अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करावा, असे आयोगाने आदेशात नमूद केले.

विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरा

एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपलेल्या व नव्याने तयार करण्यात आलेल्या तसेच जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २५ सप्टेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली विधानसभेची मतदार यादी वापरावी, असेही आयोगाने सुचवले आहे.


इतर ताज्या घडामोडी
कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे :...नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि...
कोरोना लसीकरण क्रांतिकारक पाऊल : ...मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक...
सातारा जिल्ह्यात रब्बीची ९५ टक्के...सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत गहू...औरंगाबाद : तीन जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात...
सांगलीत कारखानदारांनी एफआरपीचा केला...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर...
बँकांनी पीक कर्जवाटप वेळेत पूर्ण करावे...नगर:  ‘‘जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांना...
सांगलीत ‘पीएम किसान’च्या अपात्र...सांगली : पंतप्रधान किसान योजनेतील जिल्ह्यातील ५...
सांगली जिल्हा बॅंकेसह १७३ संस्थांच्या ...सांगली : सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे...
नाशिकला मका खरेदीसाठी ५६ हजार क्विंटलचे... येवला : केंद्र शासनाच्या परवानगीनंतर ही...
नांदेड जिल्ह्यात मतदानासाठी केंद्रांवर...नांदेड ः जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतींसाठी...
नाशिकमध्ये उत्साहात ग्रामपंचायतींचे...नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५...
गोसेखुर्द प्रकल्पासाठी भूसंपादनाचा तिढा...नागपूर : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान...
नव्या परवानगीमुळे मका उत्पादकांचा जीव...बुलडाणा : राज्यात सर्वाधिक मका खरेदी झालेल्या...
राज्यात कृषी पीएचडीची प्रवेश प्रक्रिया...पुणे ः राज्याच्या चारही कृषी विद्यापीठांमधील...
खानदेशात मका दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
सकाळी सौम्य थंडी; दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
डाळिंब बागांसाठी पाण्याचे व्यवस्थापनजानेवारी अखेरपासून पाण्याची उपलब्धता कमी होत जाते...
औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गहू संशोधनात सर्वांचाच वाटा ः डाॅ. ढवणनाशिक :  येथील गहू संशोधन केंद्रास डॉ....
कोल्हापुरात सकाळपासूनच मतदारांच्या...कोल्हापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी चुरशीने...