Agriculture news in marathi More than one lakh farmers are deprived of crop loans | Agrowon

लाखाहून अधिक शेतकरी पीक कर्जापासून वंचित

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर खरीप हंगामात पीककर्जासाठी बँकांच्या चकरा मारून, त्रास सहन करीत जिल्ह्यातील १ लाख २३ हजार ६८१  शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकले, तर १ लाख ४१ हजार १२ शेतकरी कर्जापासून वंचित राहिले आहेत.

अमरावती  : कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर खरीप हंगामात पीककर्जासाठी बँकांच्या चकरा मारून, त्रास सहन करीत जिल्ह्यातील १ लाख २३ हजार ६८१  शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकले, तर १ लाख ४१ हजार १२ शेतकरी कर्जापासून वंचित राहिले आहेत. खरीप हंगामात १ हजार ७२० कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले होते.

त्यापैकी १ हजार ७३ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ६९ हजार २१ शेतकऱ्यांना ६७६ कोटी ७० लाख रुपये, खासगी क्षेत्रातील बँकांनी १ हजार ५१८ शेतकऱ्यांना ३६ कोटी २३ लाख रुपयांचे, तर ग्रामीण बँकांनी १ हजार ३९४ शेतकऱ्यांना १६ कोटी ५५ लाख व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५१ हजार ७४८ शेतकऱ्यांना ३४४ कोटी ४६ लाख रुपये कर्ज वितरण केले आहे. कर्जवाटपाची सरासरी ६२ टक्के इतकी आहे.

खरीप हंगामात पीककर्जासाठी २ लाख ६४ हजार ६९३ शेतकऱ्यांचे लक्ष्य होते. त्यापैकी १ लाख २३ हजार ६८१ शेतकरी कर्जासाठी पात्र ठरले. कोरोना संक्रमणामुळे कर्जप्रकरणे बँकांकडे पाठवताना सहकार विभागाकडून विलंब झाला. त्यातही कर्जमाफीसाठी प्रकरणे तयार करून बँकांना पाठविण्याचा भार सहकार विभागावर होता.

यामध्ये शेतकऱ्यांचे खाते क्रमांक, आधार प्रमाणीकरण अशा तांत्रिक अडचणींसोबत कोरोनामुळे कर्मचाऱ्यांचा तुटवडा होता. कमी मनुष्यबळातही या विभागाने कर्जमाफी व पीककर्जाची प्रकरणे केली आणि कर्जवाटपाची टक्केवारी गेल्या पाच वर्षांत प्रथमच ६२ टक्‍क्‍यांवर गेली आहे.

खरीप हंगामात पीककर्जासाठी २ लाख ६४ हजार ६९३ शेतकऱ्यांचे लक्ष्य होते. त्यापैकी १ लाख २३ हजार ६८१ शेतकरी कर्जासाठी पात्र ठरले. कोरोना संक्रमणामुळे कर्जप्रकरणे बँकांकडे पाठवताना सहकार विभागाकडून विलंब झाला.

अमरावतीतील पीककर्ज स्थिती

  •     १ लाख २३ हजार ६८१  शेतकऱ्यांना कर्ज 
  •     १ लाख ४१ हजार १२ शेतकरी कर्जापासून वंचित
  •     खरिपासाठी १ हजार ७२० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्य
  •     १ हजार ७३ कोटी रुपयांचे कर्जवाटप
  •     सरकारी बँकांकडून ६९ हजार २१ शेतकऱ्यांना ६७६ कोटी ७० लाखांचे कर्ज
  •     खासगी बँकांकडून १ हजार ५१८ शेतकऱ्यांना ३६ कोटी २३ लाखांचे कर्ज
  •     ग्रामीण बँकांकडून १ हजार ३९४ शेतकऱ्यांना १६ कोटी ५५ लाखांचे कर्ज 
  •     डीसीसीकडून ५१ हजार ७४८ शेतकऱ्यांना ३४४ कोटी ४६ लाखांचे कर्ज
  •      कर्जवाटपाची एकूण सरासरी ६२ टक्के

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...