‘एसआरटी’द्वारे कमी पाण्यात अधिक उत्पादन शक्य : भडसावळे

जमीन शाश्‍वत होण्यासाठी व तिच्यातील सेंद्रिय कर्बाची सुधारणा होण्यासाठी एसआरटी शून्य मशागत तंत्रज्ञान उपयोगी आहे. त्याच्या वापराने जमीन मऊ, सुगंधी व उत्पादनक्षमता वाढविणारी झाली आहे. उपयोगी तंत्रज्ञान वापराची चळवळ निर्माण होणे काळाची गरज आहे. - चंद्रशेखर भडसावळे, एसआरटी पीक लागवड तंत्राचे जनक
‘एसआरटी’द्वारे कमी पाण्यात अधिक उत्पादन शक्य : भडसावळे
‘एसआरटी’द्वारे कमी पाण्यात अधिक उत्पादन शक्य : भडसावळे

औरंगाबाद : ‘‘ एसआरटी तंत्रज्ञानाद्वारे जमिनीची जलधारण क्षमता वाढते. या शिवाय जलपुनर्भरण होते. कमीत कमी पाण्यात पिकाचे उत्पादन घेणे शक्य होते,’’ असे एसआरटी पीक लागवड तंत्राचे जनक चंद्रशेखर भडसावळे यांनी सांगितले.  

राज्यातील १५ जिल्ह्यांत राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत (पोक्रा) शेतीशाळा समन्वयकांनी शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. त्यासाठी औरंगाबाद येथील महसूल प्रबोधिनीत शुक्रवारी (ता. ८) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबईचे कृषी विद्यावेत्ता विजय कोळेकर, मृदा विशेषज्ञ भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे, ‘आत्माचे’ उपसंचालक पी. बी. अव्हाळे, प्रकल्प विशेषज्ञ विशाल आगलावे, विद्यासागर झुबरे, फराज सय्यद, शंकर निरडे, सचिन भुजबळ व एजाज शाह आदी उपस्थित होते.

पोक्रातंर्गत ४१३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी ३८८५ गावांत शेतीशाळा सुरू आहेत. या प्रकल्पाद्वारे घेण्यात येणाऱ्या शेती शाळांमधून गावांमधील जमिनीच्या पोताची सुधारणा करणे, उत्पादकता वाढविणे आणि शेती किफायशीर बनविण्याचे उद्दिष्ट आहे. पूरक उद्योग शेततळे व इतर योजनांचे २२ प्रकारचे लाभ शेतकऱ्यांना देण्यात येतील. एकच शेतकरी एकाच वेळी एकापेक्षा जास्त लाभ, या प्रकल्पाच्या योजनांमध्ये घेऊ शकेल. जागतिक बँकेचे ७० टक्के व राज्य शासनाच्या ३० टक्के अर्थसहाय्यातून हा प्रकल्प राबविला जातो  आहे. 

प्रकल्पाद्वारे भ्रमणध्वनीद्वारे हवामान संदेश दिल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. बटाटा, हळद, ऊस या पिकांसाठी हे तंत्रज्ञान उपयोग होईल, असे वाटत नसल्याची स्पष्टोक्ती भडसावळे यांनी दिली. बीबीएफ तंत्रज्ञानाच्या उपयोगाविषयी डॉ. किशोर झाडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्या वापरासाठीचे यंत्र व त्याचा परिणामकारक वापर याविषयी समन्वयकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन डॉ. झाडे यांनी शंकांचे निरसन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com