सांगली जिल्ह्यातून डाळिंब निर्यातीसाठी नोंदणी वाढली

pomegranate export
pomegranate export

सांगली ः जिल्ह्यातून गतवर्षी ८०० टन डाळिंबाची निर्यात झाली होती. यंदा जिल्ह्यातील १०६ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. यंदाच्या हंगामात डाळिंबाची निर्यात वाढेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.  कोरडवाहू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी डाळिंब वरदान ठरते आहे. प्रतिकूल परिस्थिती शेतकऱ्यांनी डाळिंब बागा जगविल्या आहेत. गेल्यावर्षी पाण्याची टंचाई तर यंदा अतिवृष्टीमुळे डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा स्थितीतही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डाळिंबाची निर्यात करण्यासाठी नोंदणी केली आहे. यंदाच्या हंगामात १०६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.   जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र ८ हजार हेक्टर इतके आहे. शेतकऱ्यांकडून मृग, हस्त आणि आंबे बहार घेतला जातो. वास्तविक डाळिंबाचा सर्वाधिक हंगाम मृग बहरातील असतो. त्यानुसार शेतकरी नियोजन करतो. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र असून त्यानंतर जत तालुक्यात डाळिंबाची लागवड आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आटपाडी तालुक्यातून डाळिंबाची निर्यात होण्यास सुरुवात झाली आहे. रशिया आणि नेदरलॅंड या दोन देशांत डाळिंबाची निर्यात केली जाते.  डाळिंबाची निर्यात होत असल्याने डाळिंबाला चांगले दर मिळू लागले आहेत. त्यामुळे परकीय चलन जिल्ह्याला मिळू लागले आहे. निर्यात करण्यासाठी आटपाडी तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी गट पध्दतीने डाळिंबाची शेती करू लागले आहे. याच तालुक्यातील सुमारे पन्नासहून अधिक शेतकऱ्यांची डाळिंब निर्यातीसाठी पात्र ठरली आहेत.  डाळिंब निर्यातीसाठी ‘कृषी’ची हवी मदत कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती करण्यासाठी डाळिंबाची मोठी मदत मिळाली आहे. मात्र, डाळिंबाची निर्यात करण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. परंतु, डाळिंबाची निर्यात करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. पण, कृषी विभागाकडून त्यासाठी कोणतेही मार्गदर्शन करत नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे जिल्ह्यातून डाळिंबाची निर्यात कमी होत आहे. निर्यात वाढण्यासाठी कृषी विभागाची मदत हवी, तरच निर्यात वाढू शकले.    सन २०१८-१९ मध्ये झालेली निर्यात

निर्यात ८०० टन
नेदरलॅंड   ५६ कंटेनर
रशिया  ३७ कंटेनर

डाळिंब निर्यातीसाठी झालेली नोंदणी

तालुका   नूतनीकरण   नवीन एकूण
आटपाडी   ११    ८५  ९६
कडेगाव  ००  ०२    ०२
कवठेमहांकाळ  ००    ०७    ०७
खानापूर  ००   ०१  ०१
एकूण   ११  ९५  १०६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com