Agriculture news in Marathi More than Rs 50 crore damage to pomegranate orchards | Page 2 ||| Agrowon

सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून अधिक नुकसान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृग बहार दोन ते तीन वेळा धरला. यासाठी तिप्पट खर्च करुन बदलत्या वातावरणातून बागा फुलवल्या होत्या.

सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृग बहार दोन ते तीन वेळा धरला. यासाठी तिप्पट खर्च करुन बदलत्या वातावरणातून बागा फुलवल्या होत्या. मात्र, आटपाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने तालुक्यातील सुमारे चार हजार हेक्टरवरील डाळिंब पिकाला फटका बसला आहे.

मृग बहारातील हातातोंडाला आलेल्या डाळिंबाचे २० टक्क्यांपासून ते ७० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. सुमारे ४ हजार हेक्टरवरील बागांचे शुक्रवारी (ता. १८) झालेल्या पावसाने सुमारे ५० कोटींहून अधिक आर्थिक फटका बसला असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. बागेसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे.

आटपाडी तालुका दुष्काळी पट्टा. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करणारे पीक म्हणून डाळिंबाची ओळख आहे. तालुक्यात सुमारे ८ हेक्टरवरहून अधिक डाळिंबाची लागवड आहे. तालुक्यात सुमारे ३५ टक्के मृग बहारातील डाळिंब पीक घेतले जाते. दरवर्षी तालुक्याला पाण्यासाठी झगडावे लागते. प्रतिकूल परिस्थितीतून डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन घेऊन डाळिंबाची निर्यातही केली जाते. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून डाळिंब पिकाला पोषक वातावरण नव्हते. कधी पावसाची रिमझिम कधी ढगाळ वातावरण यामुळे फुलांची मोठ्या प्रमाणात गळ झाली. फुल कुज झाली. त्यातच तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला.

त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा हंगाम धरण्याची तयारी केली. अनेक शेतकऱ्यांनी दुसऱ्यांना हंगाम धरला, तर काही शेतकऱ्यांनी तीन वेळा हंगाम धरला. डाळिंबाचा हंगाम धरण्यासाठी तिप्पट खर्च केला. परंतू पिकाला निसर्गाची साथ मिळाली नाही. त्यातूनही डाळिंब बहरू लागले.  मात्र, तालुक्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. दिवसभर ढगाळ वातावरण रात्रीचा पाऊस असा खेळ सुरू झाला. आटपाडी परिसरात परतीच्या पावसाने जोरदार झोडपले. आटपाडी मंडलात अतिवृष्टी झाली. शुक्रवारी आटपाडी मंडळात १३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

अगोदरच बदलत्या वातावरणाचा फटका डाळिंबाला बसला. त्यात या पावसाने आमच्या तोंडचे पाणी पळवले आहे. डाळिंबाचे खूप मोठे नुकसान झाले असून आर्थिक तोटा कसा भरून काढायचे असा प्रश्न आमच्या समोर आहे.
- किशोरकुमार देशमुख, डाळिंब उत्पादक शेतकरी, आटपाडी

डाळिंबाला विमा घेऊन आम्ही संरक्षित केले आहे. शासनाने विम्याची रक्कम देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तर शेतकऱ्याला पुन्हा उभारण्यासाठी आर्थिक मदत होईल.
- आनंदराव पाटील,  संचालक- अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उकाडा वाढण्यास सुरूवात  पुणे ः परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार...
पीकविमा परतावा तात्काळ द्या, अन्यथा...अमरावती : जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (ॲग्रिकल्चर...
कापूस उत्पादनात मोठी घट, पीक परवडेनाजळगाव ः अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली....
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
‘कडकनाथ’ कुक्कुटपालनात निर्माण केल्या...आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १००...
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...