Agriculture news in marathi More than sixteen thousand panchnama completed in Sangli | Agrowon

सांगलीत सोळा हजारांहून अधिक पंचनामे पूर्ण

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत.

सांगली  : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात महापुरामुळे बाधित झालेल्या ११३ गावांमधील आतापर्यंत १६ हजार ८७९ कुटुंबांचे पंचनामे झाले आहेत. बाधित गावातील कुटुंबे, कृषी, पशुधन व व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीने काम करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

 जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे, ओढ्यांना जादा पाणी आल्याने मिरज, वाळवा, पलूस व शिराळा या चार तालुक्यांतील ११३ गावे बाधित झाले आहेत. महापालिका क्षेत्र तसेच ग्रामीण क्षेत्रातील एकूण ४५ हजार ३५२ कुटुंबे बाधित झाली आहेत. शासन निर्देशानुसार बाधित गावातील कुटुंबे, कृषी, पशुधन व व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.

त्यामध्ये आजअखेर १६ हजार ८७९ कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामध्ये पूर्ण नष्ट झालेली कच्ची घरे २७९, पक्की घरे ८, अशंत नष्ट झालेली कच्ची घरे १ हजार ७८, पक्की घरे ३२०, नुकसान झालेल्या झोपड्या ३४ व गोठे ६१९ आहेत. अजूनही पंचनामे सुरू असून, ते गतीने पूर्ण करण्यासाठी यंत्रणांना निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यात महापुरामुळे २७४ गावांतील ९७ हजार ४८६ शेतकऱ्यांचे ४० हजार ६७१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. आजअखेर १७४ गावांतील २४ हजार ७८१ शेतकऱ्यांचे ८ हजार ५०८.७२ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मिरज तालुक्यातील २६ गावांतील २९ हजार ११७ शेतकऱ्यांचे १० हजार ३४० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यापैकी २१ गावांतील ३ हजार ७१२ शेतकऱ्यांचे १ हजार ७२८.६४ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

तालुकानिहाय नुकसान असे
वाळवा : तालुक्यातील ९८ गावांतील ३१ हजार २४५ शेतकऱ्यांचे १३ हजार ४९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी ४१ गावांतील ७ हजार ७०१ शेतकऱ्यांचे २ हजार ६९७.६० हेक्टर पंचनामे पूर्ण झाले आहेत.

शिराळा : तालुक्यातील ९५ गावांतील १५ हजार ३५० शेतकऱ्यांचे ६ हजार ६३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी  ८७ गावांतील ८ हजार ७८६ शेतकऱ्यांचे १ हजार ८९३.६१ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

पलूस : तालुक्यातील २६ गावांतील २१ हजार ५९५ शेतकऱ्यांचे १० हजार १४६ हेक्टर बाधित झाले आहे त्यापैकी  २३ गावांतील ४ हजार ५२३ शेतकऱ्यांचे २ हजार १६२.१८

हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
तासगाव : तालुक्यातील २ गावांतील १७९ शेतकऱ्यांचे ५९ हेक्टर बाधित झाले आहे. त्यापैकी २ गावांतील ५९ शेतकऱ्यांचे २६.६९ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.


इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...