सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाज

सोयाबीन दरात आणखी तेजीचा अंदाज
सोयाबीन दरात आणखी तेजीचा अंदाज

नागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना सुखावणारी ठरली आहे. देशाअंतर्गत प्रक्रिया उद्योजकांकडून वाढती मागणी, आयात-निर्यात धोरणामुळे हे दर वधारल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यापुढील काळात सोयाबीन दरात काही अंशी आणखी तेजीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

यापूर्वी बाजारात सोयाबीन २७०० पेक्षा कमी दराने खरेदी केल्या गेले. सध्या बाजारात आयात-निर्यात धोरण त्यासोबतच स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी वाढल्याने दरात तेजी आल्याचे सांगितले जाते. नागपूरच्या कळमणा बाजार समितीत सध्या सोयाबीनची १२०० क्‍विंटलची आवक आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर ३१०० ते ३४०० रुपये क्‍विंटल होते. त्यात वाढ होऊन ते या आठवड्यात ३३७५ ते ३५७० रुपये क्‍विंटलपर्यंत पोचले. यापुढील काळात या दरात काही अंशी आणखी तेजीचा अंदाज वर्तविला गेला आहे. बाजारात हरभऱ्याची १०० क्‍विंटलची आवक आहे. ३८०० ते ४४५० रुपये क्‍विंटलने हरभऱ्याचे गेल्या आठवड्यात व्यवहार  झाले. त्यानंतर ४४८० रुपयांपर्यंत हे दर गेले होते. आता हे दर ४४०० रुपयांवर आले आहेत. हे दर असेच स्थिर राहतील, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.  

बाजारात तुरीची देखील नियमित आवक आहे. ४३०० ते ४९०१ रुपये क्‍विंटलचा दर गेल्या आठवड्यात तुरीला होता. या आठवड्यात काहीशी तेजी आली. ४७०० ते ५४०२ रुपये क्‍विंटलवर ते पोचले. मुगाचे दर ३८०० ते ४००० रुपये क्‍विंटल होते. मुगाची अवघी ४ क्‍विंटल आवक नोंदविण्यात आली. ज्वारीची १० ते ३० क्‍विंटल अशी आवक आहे. दर २००० ते २४०० रुपये क्‍विंटलचे मिळाले. गहू आवक ५६ ते १०० क्‍विंटल अशी होती. सरबती गव्हाचे दर २६०० ते २९०० रुपये क्‍विंटल असे स्थिर आहेत. तांदळाचे दर २२०० ते २४०० रुपये क्‍विंटल असून २४० क्‍विंटलची सरासरी आवक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com