केरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ; ३८५ मृत्यूमुखी

केरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ; ३८५ मृत्यूमुखी
केरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ; ३८५ मृत्यूमुखी

तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी आणि महापूरांमुळे आत्तापर्य़ंत ३.५३ लाखांवर लोक विस्थापित असून ३८५ मृत्यूमुखी पडले आहेत. २६ हजारावर घरे आणि ४० हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात पाणी-अन्न टंचाईसह आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. वीज, दूरसंचार आदी व्यवस्था पूर्णत: कोलमडल्या असून मदत कार्यात यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. बहुतांश भागात नागरिकांचे प्रचंड हाल होत असून रस्ते खचल्याने अनेक भागात मदत पोचण्यास अडथळे निर्माण होत आहेत. केंद्राच्या ५०० कोटींसह विविध राज्यांनी मदत जाहिर केल्या आहेत. केरळमधील १४ पैकी १३ जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर असून, छोट्या बेटावर हजारो लोक अन्न आणि पाण्याशिवाय अडकले असताना बचाव पथकांना त्यांच्यापर्यंत पोचण्यात अनेक अडथळे येत आहेत. अलाप्पुझा शहरालाही पुराच्या पाण्याचा वेढा आहे. 

पावसाच्या शक्‍यतेच्या पार्श्‍वभूमीवर ११ जिल्ह्यांत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, अलाप्पुझा येथे बचाव मोहिमेला नकार देणाऱ्या ३० मोटर बोटी जिल्हा प्रशासनाने जप्त केल्या आहेत. या बोटीच्या मालकांना अटक करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत.  पूरग्रस्त भागात पाण्याची पातळी अजूनही कमी झालेली नाही. मात्र, शुक्रवारी आणि शनिवारी पाऊस नसल्यामुळे बचाव मोहिमेला वेग आला. लष्कराने त्रिवेंद्रम विमानतळावरून आणखी २० बोटी आणल्या आहे. अनेक ठिकाणांचा संपर्क तुटला असून, तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लोकांना अन्न आणि पाण्यावाचून राहावे लागत आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून मोठ्या प्रमाणात बचाव मोहीम राबविली जात आहे. पम्पा नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने लोक अडकले आहेत. अनेक लोक इमारतींच्या छतावर आश्रय घेत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, अन्नाची मदत काही ठिकाणीच पोचली जात आहे. अनेक भागातील वीज आणि संपर्क यंत्रणा कोलमडली आहे. ................... सर्वांत मोठी बचाव मोहीम ५८ : राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके कार्यरत ३५-४० : प्रत्येक पथकातील कर्मचाऱ्यांची संख्या १९४ : लोकांना पुरातून वाचविण्यात यश १०४६७ : लोकांना सुरक्षितस्थळी पोचविले ३०२६ : पुर्नवसन शिबिरांत ३ लाख ५३ हजार लाेक

लढाऊ वृत्तीबद्दल केरळच्या लोकांना मी सलाम करतो. या आपत्तीच्या काळात संपूर्ण देश केरळच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. केरळच्या लोकांची सुरक्षा आणि कल्याणासाठी आम्ही प्रार्थना करतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

आपत्तीच्या काळात केंद्र सरकार केरळकडे दुर्लक्ष करत आहे. राज्याने २ हजार कोटी रुपयांची तातडीची मदत मागितली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली मदत पुरेशी नाही. - सीताराम येचुरी, माकपचे सरचिटणीस

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com