आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
अॅग्रो विशेष
पुण्यात दोन हजार फूल वाणांवर होणार संशोधन
पुणे : शेतकऱ्यांना फुलांचे नवनवीन वाण उपलब्ध हाेण्यासाठी पुष्प संशाेधन संचालनालयाचे संशाेधन आणि प्रयत्न सुरू आहेत. याकरिता देशभरातील गुलाबांचे तब्बल २ हजारांपेक्षा जास्त वाणांचे संवर्धन आणि प्रसार पुणे येथून हाेणार आहे. या वाणांच्या संवर्धन प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, ५० वाणांची लागवड मांजरी येथील प्रक्षेत्रावर करण्यात आली आहे.
पुणे : शेतकऱ्यांना फुलांचे नवनवीन वाण उपलब्ध हाेण्यासाठी पुष्प संशाेधन संचालनालयाचे संशाेधन आणि प्रयत्न सुरू आहेत. याकरिता देशभरातील गुलाबांचे तब्बल २ हजारांपेक्षा जास्त वाणांचे संवर्धन आणि प्रसार पुणे येथून हाेणार आहे. या वाणांच्या संवर्धन प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, ५० वाणांची लागवड मांजरी येथील प्रक्षेत्रावर करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती देताना पुष्पसंशाेधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद म्हणाले, ‘‘पुष्पसंशाेधन संचालनालयाच्या वतीने शेतकऱ्यांना बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध फुलांचे वाण उपलब्ध हाेऊन पीक पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी येथे संशाेधन सुरू आहे. विशेषत: गुलाब फुलावर अधिक लक्ष केंद्रित केले असून, देशात गुलाबांचे सुमारे २ हजारपेक्षा जास्त वाण उपलब्ध आहेत. यामध्ये काही वाणांना जाती आहेत, तर काही केवळ रंगानुसार आेळखले जातात. मात्र या सर्व विविध वाणांचे नामकरण, नाेंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी पुष्पसंशाेधन संचालनालयाच्या वतीने संशाेधन आणि प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक पातळीवर सध्या ५० वाणांची लागवड करण्यात आली आहे.’’
भारतीय कृषी संशाेधन परिषदेचे पहिले माजी महासंचालक डॉ. बी. पी. पॉल यांनी १०४ गुलाब पुष्पांचे वाण विकसित केले आहेत, तर परिषदेने सुमारे १ हजार वाण विकसित केलेले आहेत. या वाणांबराेबरच शेतकऱ्यांनी स्वतःचे वाणदेखील विकसित केलेले आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी विकसित केलेले वाण हे केवळ रंगानुसार आेळखले जातात अाणि त्यांची संख्यादेखील माेठी आहे. हे सर्व वाण एकाच ठिकाणी लागवड करून त्यावर संशाेधन आणि विकास करण्यात येणार आहे, असेही डॉ. प्रसाद यांनी सांगितले.
वाणांना नाव देणे माेठे आव्हान
देशभरात उपलब्ध असलेले अनेक वाण केवळ रंगानुसार आेळखले जातात. या सर्व वाणांना शास्त्रीय नावे देऊन त्यांचा प्रसार करण्याचे प्रयत्न असून, शेतकऱ्यांना नवीन वाणांच्या उपलब्धतेतून नवीन पीक पर्यायदेखील उपलब्ध हाेणार आहे. पुष्प संशाेधन संचालनालयाकडे सध्या गुलछडीचे २२, शेवंतीचे १४० आणि ग्लॅडिआेलसचे १०० वाण उपलब्ध असून, त्यावर संशाेधन सुरू आहे, अशी माहिती पुष्प संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी दिली.
- 1 of 673
- ››