सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन द्राक्ष निर्यात

​यंदा प्रतिकूल परिस्थितीत निर्यातक्षम द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करून जगविल्या आहेत. हवामानात बदल होत असल्याने द्राक्षाची गुणवत्ता साधारण आहे. मात्र, सध्या निर्यातक्षम द्राक्षाचे दर स्थिर आहेत. - डी. एस. शिलेदार, कृषी अधिकारी (निर्यात)
grapes
grapes

सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या संकटावर मात करत यंदा जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी द्राक्षाचे उत्पादन घेतले. यंदाच्या द्राक्ष हंगामात गेल्या महिनाभरात जिल्ह्यातून १७९ कंटेनर निर्यात झाली आहे. युरोपात सर्वाधिक १५१ टन तर इतर देशांमध्ये ५७ टन अशी एकूण २ हजार ३२० टन द्राक्ष निर्यात झाली आहे. सांगली जिल्हा हा उसाच्या शेतीबरोबरच गेल्या काही वर्षांपासून द्राक्षभूमी म्हणून ओळखला जातो. निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे आता ऊसापेक्षाही द्राक्षाची गोडी शेतकऱ्यांसाठी वाढली आहे. यंदाच्या हंगामात सुरुवातीला दुष्काळ पडला. या दुष्काळात खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, मिरज परिसरात अक्षरशः टँकरने पाणी देऊन बागा जगविल्या. त्यानंतर ऐन फ्लावरिंगमध्ये अवकाळी पाऊस झाला, तर ऑगस्ट महिन्यात दुष्काळी भागात अतिवृष्टी होऊन पावसाने द्राक्ष बागांना तडाखा दिला. यामध्ये अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अशा तिहेरी संकटाच्या दाढेतून काही शेतकऱ्यांनी द्राक्षे बागा वाचविल्या. त्यातही पुन्हा निर्यातक्षम गुणवत्ता टिकवणे अवघड असताना ते शिवधनुष्यही शेतकऱ्यांनी लिलया पेलले. त्यामुळे यंदाच्या निर्यातक्षम द्राक्षांना खूपच महत्त्व आहे.  गतवर्षी, २०१९ च्या हंगामात जिल्ह्यातून एकूण ७ हजार ४८४ टन इतक्या द्राक्षांची युरोपात तर इतर देशांमध्ये ६५९० टन निर्यात झाली होती. यंदा एका महिन्यात २ हजार ३२६ टन निर्यात झाली आहे. यापुढील काळातही उत्पादन कमी असल्यामुळे द्राक्षांना चांगला भाव आणि मागणी असेल अशी अपेक्षा आहे. या देशांमध्ये होतेय निर्यात लिथुनिया, नेदरलॅँड, नॉर्वे, युनायटेड किंगडम, लेक्सींबर्ग, जर्मनी, चेक, डेंमार्क, फिन्लॅड, इटली, लॅथवा, आर्यलॅंड, स्पेन, ऑर्स्टेलिया, बेलजियम, स्वर्त्झलॅँड, बॅरेन, कॅनडा, चीन, हॉँगकॉँग, कुवेत, मलेशिया, ओमान, कतार, रोमानिया, रशिया, सौदी आरेबिया, श्रीलंका, तैवान, थायलंड, युक्रेन, युएई    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com