जळगाव जिल्ह्यात खतांचा सर्वाधिक वापर

खतांचा सर्वाधिक वापर व विक्री जळगाव जिल्ह्यात असल्याचे खते मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. यासोबत जळगाव जिल्ह्यात विद्राव्य खते, तणनाशकांचाही वापर वाढत असल्याचे कृषी विभागाचे निरीक्षण आहे. - मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
खत वापर
खत वापर

जळगाव ः राज्यात रासायनिक खतांचा जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक वापर झाला आहे. २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यात रब्बी व खरिपात मिळून चार लाख चार हजार १४७ मेट्रिक टन खतांची विक्री झाली आहे. खतांच्या खपासंबंधी औरंगाबाद जिल्हा राज्यात दुसरा असल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली आहे.  तापीकाठावरील रावेर, यावल, जळगाव, चोपडा, मुक्ताईनगर आणि गिरणा पट्ट्यातील भडगावात केळीखालील ४३ हजार हेक्‍टर क्षेत्र १०० टक्के सुक्ष्म सिंचनाखाली आहे. याच वेळी पूर्वहंगामी कपाशीही दरवर्षी जवळपास ८१ ते ८२ हजार हेक्‍टर क्षेत्रावर असते. कपाशी लागवडीत जळगाव जिल्हा मागील चार वर्षे राज्यात पहिला राहिला असून, यंदा चार लाख ७५ हजार हेक्‍टरवर कपाशी लागवड आहे. १५ तालुके आणि खरिपाखाली दरवर्षी व्यापणारे सात लाख ७८ हजार हेक्‍टर क्षेत्र, अशा सर्व स्थितीमुळे खतांची मागणी जळगाव जिल्ह्यात जास्त राहिल्याचे निरीक्षण जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नोंदविले आहे.  जसा सरळ, मिश्र खतांचा वापर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे, तसा विद्राव्य खतांचा वापरही वाढला आहे. केळी उत्पादक फ्रूट केअर तंत्रज्ञानाकडे वळत असल्याने रावेर, मुक्ताईनगर, यावल आणि चोपडा या तालुक्‍यांमध्ये दरवर्षी जवळपास १० ते साडे १० कोटी रुपयांच्या विद्राव्य खतांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली. रासायनिक खतांमध्ये युरियाचा सर्वाधिक दीड लाख मेट्रिक टन वापरही जिल्ह्यात झाला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असलेल्या नगर जिल्ह्यात तीन लाख ३० हजार ७७ मेट्रिक टन एवढ्या रासायनिक खतांची विक्री झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात तीन लाख ४६ हजार २४३ मेट्रिक टन एवढी विक्री झाली आहे.  खत कंपन्यांकडून घाऊक विक्रेत्यांना खतांची झालेली विक्री (टनांमध्ये) अहमदनगर - ३३००७७.४०, अकोला - ९०९४३.८०, अमरावती - ११८८३५.९०, औरंगाबाद - ३४६२४३.८५, बीड - १७०२१५.१५, भंडारा - ७९९४१.४५, बुलडाणा - २१११३६.१०, चंद्रपूर - १२४७०९.२०, धुळे - ११३२९७.६०, गडचिरोली - ५२०६५.२५, गोंदिया - ७४७३३.४५, हिंगोली - ५२१३४.७५, जळगाव - ४०४१४७.८०, जालना - २३०६४१.३५, कोल्हापूर - २७४६३१.४५, लातूर - १०८९५८.९०, नागपूर - १५२०३५.७०, नांदेड - ३०३६८९.४५, नंदुरबार - १११६०८.१५, नाशिक - ३०६६६४.२०, उस्मानाबाद - ६३४०२.९०, पालघर - २०९८३.५०, परभणी- ११७३५५.७५, पुणे -२७०३५१.९०, रायगड - ९४७६३.३०, रत्नागिरी - ८९१८.७५, सांगली - २२०८६०.६५, सातारा - १७८३०१.१०, सिंधुदुर्ग - ८२८५.८०, सोलापूर - २४२९१०.७३, ठाणे - ९१७५.७५  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com