Agriculture news in marathi More water storage in Gadhinglaj this year | Agrowon

गडहिंग्लजमध्ये यंदा अधिक पाणीसाठा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे तालुक्यात पाण्यासाठी चांगले दिवस आहेत. हिरण्यकेशी नदीसह तालुक्‍यातील विविध तलावांमधील पाण्यालाही अजून तरी उपसाबंदी लागू केलेली नाही. तलावांमध्ये गतवर्षीपेक्षा १५ ते ६० एमसीएफटीने पाणीसाठा अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे तालुक्यात पाण्यासाठी चांगले दिवस आहेत. हिरण्यकेशी नदीसह तालुक्‍यातील विविध तलावांमधील पाण्यालाही अजून तरी उपसाबंदी लागू केलेली नाही. तलावांमध्ये गतवर्षीपेक्षा १५ ते ६० एमसीएफटीने पाणीसाठा अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.

तालुक्‍यात नरेवाडी, तेरणी, येणेचवंडी, करंबळी, वैरागवाडी, शेंद्री आणि कुमरी तलाव आहेत. हिरण्यकेशी नदीतील पाण्याचे नियोजन करून उपसाबंदी लागू केली होती. गतवर्षीही चित्री प्रकल्प शंभर टक्के भरला होता. परंतु, पावसाचे पाणी साठवणूक आणि आवर्तनातील सावळ्या गोंधळामुळे अखेरच्या टप्प्यात कमी पडते की काय, अशी अवस्था तयार झाली. 

ऑगस्टमधील अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसामुळे जमिनीत ओलावा कायम राहिला. यामुळे डिसेंबरपर्यंत पाण्याचा उपसाच झाला नाही. पावसाचे अडवलेले पाणी जानेवारीपर्यंत पुरले. यामुळे २३ जानेवारीला चित्रीतून पहिले आवर्तन सोडले. अजूनही हिरण्यकेशीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा आहे.

हिरण्यकेशी नदीवरील निलजी बंधाऱ्याखाली (लाभक्षेत्राबाहेर) उपसाबंदी कायम आहे. दहा दिवस उपसा आणि २० दिवस बंदी असे रोटेशन आहे. चित्रीच्या पाण्यामुळे खणदाळ, नांगनूरसह इदरगुच्ची, कडलगे आदी गावांना बारमाही पाणी उपलब्ध होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांचे बैठकांद्वारे पाणी नियोजन

शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन पाणी नियोजन केले आहे. रात्रीचा उपसा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उपलब्ध साठा जुलैपर्यंत पुरेल या पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना पाण्याची शाश्‍वती मिळाली असल्याने उपसा योग्य वेळी सुरू असल्याचे चित्र आहे. जुलैपर्यंत उपलब्ध पाणी पुरण्यास मदत होणार आहे.


इतर बातम्या
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...
सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
सोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...
खुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...
निफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...