काजू, सुपारी, भातासाठी तारण याेजना

काेकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भिवंडी, मुरबाड, शहापूर, महाड, माणगाव, पेण, रोहा, मुरुड या बाजार समित्यांमार्फत काजू, सुपारी आणि भात पिकांसाठी शेतीमाल तारण योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये ३ काेटी १० लाखांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यामुळे काजू, सुपारी आणि भात उत्पादकांना निश्चितपणे दिलासा मिळेल. - सुनील पवार, कार्यकारी संचालक, पणन मंडळ
काजू, सापारी
काजू, सापारी

पुणे ः काेकणातील शेतकऱ्यांना शेतीमाल तारण याेजनेचा लाभ मिळावा, यासाठी काेकणातील १० बाजार समित्यांमध्ये काजू, सुपारी आणि भात तारणा याेजना पुढील वर्षी राबविण्यात येणार आहे. यासाठी पणन मंडळाच्या वतीने ३ काेटी १० लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. तर काजू तारण याेजनेत यंदा १४ शेतकऱ्यांना ७२ टन तारणातून ७२ लाखांचे कर्ज वितरित केले आहे.     पणन मंडळाच्या शेतीमाल तारण याेजनेअंतर्गत काजू तारणासाठीचे प्रतिकिलाेच्या दरात २० रुपयांनी वाढ केली असून, हा दर आता १०० रुपये करण्यात आला आहे. तसेच सुपारीचादेखील तारण याेजनेत समावेश करण्यात आला असून, त्याचा दरदेखील १०० रुपये प्रतिकिलाे ठरविण्यात आला आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार काेकणात तारण याेजना राबवली जात आहे. शेतीमाल तारण ठेवताना त्या दिवशीच्या बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम ६ टक्के व्याज दराने १८० दिवसांसाठी शेतकऱ्यांना देण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल तत्काळ विक्री न करता पैसे उपलब्ध होतात, तसेच भविष्यात शेतीमालाच्या बाजार भावात होणाऱ्या वाढीचा फायदा मिळतो.  या याेजनेच्या अंमलबजावणीसाठी काेकण विभागाचे व्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील आणि रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी यांनी काजू उत्पादकांसाठी विविध ठिकाणी बैठका घेऊन तारण योजनेबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली. सदर बैठकीमधील शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहून कृषी उत्पन्न बाजार समितीने ग्रामीण भागातील काही गोदामे निश्चित करून सदर गोदामांच्या उपलब्धतेसाठी करार केला, तसेच गोदामांचा विमा काढला. २०१८ च्या मे आणि जून महिन्यामध्ये कोकणातील एकूण १४ शेतकऱ्यांनी ७२.६८ टन काजू बी तारणात ठेवलेली असून, या पोटीबाजार समितीने शेतकऱ्यांना अदा केलेल्या रकमेची प्रतीपूर्ती कृषी पणन मंडळाने बाजार समितीस केलेली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com