सावकारांकडे गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने मिळू लागले परत

सावकारांकडे गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने मिळू लागले परत
सावकारांकडे गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने मिळू लागले परत

अकोला ः वर्षानुवर्षे सावकारांकडे गहाण पडून असलेले सोने-चांदीचे दागिने शासनाने केलेल्या कर्जमाफीमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना परत मिळू लागले आहेत. एकट्या अकोला जिल्ह्यात ९ हजार शेतकऱ्यांकडील सुमारे ५० कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. या शेतकऱ्यांपैकी एक हजार शेतकऱ्यांचे सोने-चांदीचे दागदागिने परत करण्याची प्रक्रिया सध्या राबवली जात असून, आजपर्यंत ९० शेतकऱ्यांना त्यांचे गहाण ठवलेले सोने परत मिळाले आहे.

शासनाने सावकारी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर या कर्जमाफी योजनेमार्फत जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे सावकाराकडे तारण असलेले सोने शेतकऱ्यांना परत दिले जात आहे. अकोला जिल्ह्यात नऊ हजार सावकारग्रस्त शेतकरी आहेत. त्यांनी सावकारांकडून कर्ज घेताना गहाण म्हणून सोन्याचे दागदागिने ठेवलेले आहेत. या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेअंतर्गत सुमारे ५० कोटींची कर्जमाफी मिळण्याचा अंदाज आहे. या शेतकऱ्यांपैकी एक हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत जिल्हा समितीने मंजूर केलेली आहे. त्यातील शेतकऱ्यांचे दागिने सन्मानाने परत केले जात आहेत. शिवाय शेतकऱ्यांना कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्रही मिळत आहे. 

जिल्ह्यात गेल्या काही वर्षात सातत्याने नापिकी होत राहिल्याने शेतकरी कर्जबाजारीपणाचे स्वरूप वाढले होते. उत्पादन व उत्पन्नाचा ताळमेळ न जुळल्याने शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेले कर्ज तसेच राहून व्याज वाढत होते. 

वर्षानुवर्षे या रकमा वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आला होता. या कर्जापायी काही शेतकरी आत्महत्याही झालेल्या  आहेत. या सावकारग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांवरील सावकारांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. याचा लाभ आता शेतकऱ्यांच्या पदरात पडू लागला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com