agriculture news in marathi Mosambi, Amla strengthens immune capacity | Page 2 ||| Agrowon

मोसंबी, आवळा वाढवितात रोग प्रतिकारशक्ती

ज्ञानेश्वर शिंदे,  प्रा.सुनिता पोपळे
गुरुवार, 26 मार्च 2020

जीवनसत्त्व ‘क’ याचे प्रमाण सर्वांत जास्त  आंबट फळांमध्ये असते.  लिंबू, आवळा ,संत्री, मोसंबी, टोमॅटो, द्राक्ष,अननस, डाळिंब, किवी , पेरू, स्ट्रॉबेरी आणि भाज्यांमध्ये सुद्धा जीवनसत्त्व ‘क’ असते.

सध्याच्या काळात योग्य व समतोल पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे. प्रत्येक उपचार पद्धतीमध्ये “आहाराला” महत्त्वाचे स्थान आहे.  अचानक बदलणाऱ्या तापमानामुळे किंवा अस्थिर वातावरणामुळे अनेक जणांना तब्येतीच्या तक्रारी उद्भवतात. सर्दी ,खोकला, घसा दुखी, डोकेदुखी या सर्व आजारापासून वाचण्यासाठी आपण पौष्टिक आहार घेतला पाहिजे. सध्याच्या काळात आपल्या आहारात फळांचा समावेश करावा.

आपल्या शरीरात जीवनसत्त्व ‘क’ असणे  गरजेचे आहे. जीवनसत्त्व ‘क’ हे क्षय, दमा, फुप्फुसाचे आजार, सर्दी, खोकला इत्यादी आजारामध्ये रुग्णांची क्षमता वाढवण्यास व रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे.  जीवनसत्त्व ‘क’ याचे प्रमाण सर्वांत जास्त  आंबट फळांमध्ये असते.  लिंबू, आवळा ,संत्री, मोसंबी, टोमॅटो, द्राक्ष,अननस, डाळिंब, किवी , पेरू, स्ट्रॉबेरी आणि भाज्यांमध्ये सुद्धा जीवनसत्त्व ‘क’ असते. आहारात शतावरी, अश्वगंधा,शिलाजित,तुळस आणि हळदीचा वापर  केल्याने प्रतिकारशक्ती वाढते.आपल्या आहारात  जीवनसत्त्व, खनिजयुक्त पदार्थ वाढविण्याची गरज आहे.

मोसंबी 

 • रोग प्रतिकार क्षमता वाढते. शरीरातील अशक्तपणा दूर होतो 
 • जीवनसत्त्व सी भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा, केस, डोळे यासाठी  फायदेशीर. 
 • नियमित सेवन केल्यास त्वचा उजळते. 
 • पौष्टिक, रुचकर, पाचक,  हृदयास उत्तेजना देणारे, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे. 
 • स्क्वॅश, सिरप, मार्मालेड, जॅम आदी पदार्थ बनवून मूल्यवर्धन करता येते. 

मोसंबी स्क्वॅश

 • मोसंबीचा रस काढून, गाळून घ्यावा. 
 • स्क्वॅश बनविताना रस कमीत कमी २५ टक्के, एकूण विद्राव्य घटक ४५ टक्के व आम्लता ०.८ टक्का असणे आवश्‍यक आहे. 
 • रस एक लीटर, साखर १.६९४ कि.ग्रॅ. सायट्रिक आम्ल २० ग्रॅम, पाणी १२५० मि.लि., सोडिअम बेंझोएट दोन ग्रॅम या प्रमाणात वापरावे.
 • प्रथम साखर, पाणी एकत्र करून उकळून घ्यावे. हे द्रावण उकळत असताना येणारी मळी काढून घ्यावी. 
 • तयार झालेले पाणी व साखरेचे द्रावण थंड करून त्यामध्ये रस एकजीव करून घ्यावा. 
 • दोन ग्लासमध्ये थोडा थोडा स्क्वॅश घेऊन एकामध्ये सायट्रिक आम्ल व दुसऱ्यामध्ये सोडिअम बेंझोएट घेऊन विरघळून 
 • ते स्क्वॅशमध्ये मिसळावे. तयार झालेला स्क्वॅश पुन्हा मलमलच्या कापडातून गाळून घेऊन निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या व थंड जागी साठवावा. 
 • स्क्वॅशपासून सरबत तयार करताना त्यामध्ये दोन ते तीन पट पाणी टाकून थंड करून पिण्यासाठी वापरतात.

मोसंबी सिरप 

 • सिरप बनविताना प्रमाणीकरणानुसार कमीत कमी २५ टक्के रस, एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ६५ टक्के, आम्लता ०.८ ते १.२ टक्का असावी.
 • एक लीटर रस असल्यास, २.५ कि.ग्रॅ. साखर, २० ग्रॅम सायट्रिक आम्ल, २ ग्रॅम सोडिअम बेंझोएट वापरावे. 
 • सिरप तयार करण्याची कृती, पॅकिंग व साठवण स्क्वॅशप्रमाणे करावी. 
 • -सिरपपासून सरबत बनविताना त्यामध्ये चार ते पाच पट पाणी मिसळून थंड करून पिण्यासाठी वापरावे.

मोसंबी जेली 

 • जेली तयार करण्यासाठी रसरशीत ताजी व पक्व फळे निवडावीत.
 • फळे पाण्याने धुऊन, सोलून, पांढरा पापुद्रा काढून स्वच्छ करावीत.
 • स्वच्छ केलेल्या मोसंबीच्या फोडींचे छोटे छोटे काप करून घ्यावेत. 
 • एका स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात वरील काप घेऊन ते बुडतील एवढ्या पाण्यात मंद शेगडीवर उकळत ठेवावेत. 
 • थोड्या वेळाने शिजविलेले फोडींचे तुकडे मलमलच्या कापडात बांधून टांगून ठेवावेत.  
 • कापडातून झिरपणारा फोडींचा रस दुसऱ्या स्टीलच्या पातेल्यात जमा करावा. 
 • या रसात १:१ या प्रमाणात साखर मिसळून रस उकळावा. हे द्रावण एकूण विद्राव्य घटक ६७.५ अंश ब्रिक्‍सच्या वर येईपर्यंतच उकळावे. 
 • तयार झालेली जेली रुंद तोंडाच्या निर्जंतुक केलेल्या बरणीत भरून हवाबंद करून ठेवावी. जेली थंड व कोरड्या जागी साठवावी.

मोसंबी मार्मालेड 

 • मार्मालेड तयार करताना जेलीमध्ये शिजलेल्या सालीचे तुकडे टाकतात.
 • सुरुवातीला सालीचे छोटे छोटे तुकडे करावेत. एका स्टीलच्या पातेल्यात हे तुकडे घेऊन ते बुडतील एवढ्या पाण्यात उकळत ठेवावेत. 
 • हे करत असताना तीन वेळा पाणी उकळून बदलावे.  
 • तयार जेलीमध्ये मोसंबीच्या सालीचे तीन वेळा उकळलेले तुकडे टाकावेत. हवाबंद करून थंड व कोरड्या जागी साठवावे.

आवळा 

 • रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त.
 • वात,पित्त आणि कफ दोषांवर उपयुक्त, यात जीवनसत्त्व ‘क’ असते त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढण्यात त्याची मदत होते.
 • ज्यूस, सुपारी,  लोणचे,  चटणी,  मुरब्बा,  कॅन्डी, पावडर घरच्या घरी तयार करता येते.

आवळा सुपारी 

 • आवळे स्वच्छ धुऊन उकडून घ्यावेत. बिया काढून टाकाव्यात.
 • तुकडे बरणीत भरून २ चमचे सैधव मीठ, १ चमचा साधे मीठ आणि अर्धा चमचा काळी मिरपूड, प्रत्येकी अर्धा चमचा जिरे व ओवा पूड मिसळावी.
 • सर्व मिश्रण एकत्र मिसळावे. हे मिश्रण ३ दिवस मुरू द्यावे. दिवसातून दोन वेळा हलवावे.नंतर मिश्रण ताटामध्ये पसरवून उन्हात वाळवावे. 
 • ३ ते ४ दिवस वाळवल्यानंतर तयार सुपारी हवाबंद डब्यात भरावी.

आवळा लोणचे

 • अर्धा किलो आवळे मंद आचेवर वाफवून, बिया वेगळ्या कराव्यात.
 • कढईत तेल घालून त्यात लाल मिरच्या लालसर रंग होईपर्यंत तळाव्यात.
 • तेलामध्ये १ मोठा चमचा मोहरी व प्रत्येकी १ चमचा जिरे, बडीशेप, १/४ चमचा ओवा, १ चिमूट हिंग, अर्धा चमचा हळद व गरम मसाला तळून घ्यावा.
 • तेलातील मिश्रणात आवळे सोडावेत, चवीनुसार मीठ घालून मिसळावे.
 • सर्व मिश्रण गार होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्यात लाल तिखट घालून ढवळावे. बरणीत भरावे.

आवळा ज्यूस (रस)

 • आवळ्याचे तुकडे करून त्यामध्ये बिया वेगळ्या करून ते मिक्सरमध्ये दळून त्याची बारीक पेस्ट बनवावी. थोडे पाणी टाकावे. 
 • हे मिश्रण परत मिक्सर मध्ये दळावे.  मिश्रणाला गाळून घ्यावे. 
 • नंतर चवीप्रमाणे त्यात काळी मिरी, आले हे चवीसाठी मिसळावे.

आवळा चटणी

 • आवळ्यामधील बिया वेगळ्या करून ग्राइंडर मध्ये ठेवावे. आले, मीठ चवीसाठी मीठ मिसळून चटणी बनवावी.

 : ज्ञानेश्वर शिंदे, ७५८८१७९५८०
(अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग,सॅम हिगिनबॉटम कृषी तंत्रज्ञान आणि विज्ञान विद्यापीठ, प्रयागराज,उत्तर प्रदेश


इतर कृषी प्रक्रिया
राईसमिल, पोहे निर्मितीतून व्यवसायवृद्धीवेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे शंकर जाधव...
काजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थमहाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू...
आरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...
फळे व पालेभाज्यांचे कॅनिंगफळे व पालेभाज्या प्रक्रिया आणि निर्जंतुकीकरण...
बचतगटाच्या महिलांनी नव्या ग्राहकांसह...कोरोनाच्या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे...
अन्नधान्य साठवणुकीच्या पद्धतीशेतीमालाच्या साठवणुकीच्या काही पारंपरिक पद्धती या...
फळे आणि भाज्या निर्जलीकरणाच्या विविध...मागील भागात आपण छोट्या प्रमाणावर उद्योग करणाऱ्या...
फळे, भाज्या निर्जलीकरणाच्या विविध पध्दतीफळे व भाज्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता कमी...
असे तयार करा कारल्यापासून चिप्स, रसकारले चवीने कडू असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर...
फळे, पालेभाज्यांचे निर्जलीकरण ठरते...निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये फळे, पालेभाज्यांमधून...
साठवणूक हळद बेण्याची...निवडलेले बेणे जातिवंत आणि चांगले असेल तर उत्पादन...
आरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...
औषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....
महत्त्व‘प्रोबायोटीक’ खाद्यपदार्थांचे...शरीरातील आतड्यांमध्ये आढळणारे लॅक्टोबिसीलस आणि...
गुलकंद अन सुगंधी तेलनिर्मितीदर नसल्याने फेकून द्याव्या लागणाऱ्या किंवा वाया...
खरबुजाचे मूल्यवर्धित पदार्थखरबुजामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन...
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...
भाजीपाल्याची योग्य हाताळणी महत्वाचीपॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो....
गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे...सेंद्रिय शेतीला सध्याच्या काळात मोठे महत्व आले...
बागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...सध्या वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची...