agriculture news in marathi Mosambi in Aurangabad General Rs 3000 | Agrowon

औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३००० रुपये

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जानेवारी 2021

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१६) मोसंबीची ५ क्‍विंटल आवक झाली. त्यांना सर्वसाधारण ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१६) मोसंबीची ५ क्‍विंटल आवक झाली. त्यांना सर्वसाधारण ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी १९ क्‍विंटल आवक झालेल्या ऍपल बोरांचे सर्वसाधारण दर ९०० रुपये राहिले. ८ क्‍विंटल आवक झालेल्या संत्र्यांची सर्वसाधारण दर १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १३५ क्‍विंटल आवक झालेल्या कलिंगडाला सर्वसाधारण ४०० रुपये, खरबुजाची आवक २२ क्‍विंटल, तर सर्वसाधारण दर ११०० रुपये, द्राक्षाची आवक ६ क्‍विंटल, सर्वसाधारण दर ३५०० रुपये, २६५ क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याला सर्वसाधारण १०५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

हिरव्या मिरचीचे दर सर्वसाधारण ३२०० रूपये, कांद्याची आवक ५०४ क्‍विंटल, तर सर्वसाधारण दर २६०० रुपये, २९ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला सर्वसाधारण ६०० रुपये, टोमॅटोची आवक ९९ क्‍विंटल, सर्वसाधारण दर ७५० रुपये, ३७  क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांचे सर्वसाधारण दर १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

३ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीचे सर्वसाधारण दर ३५०० रुपये, ३३ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १००० रुपये, भेंडीची आवक १६ क्‍विंटल, तर सर्वसाधारण दर २००० रुपये राहिले. कोबीची ४२ क्‍विंटल आवक, तर दर सर्वसाधारण ४५० रुपये, लिंबांची आवक ११ क्‍विंटल, दर लिंबांना सर्वसाधारण २६५० रुपये दर मिळाला. 

पपईला सर्वसाधारण ४०० रुपये

शेवग्याचे सर्वसाधारण दर २७५० रुपये, ११० क्‍विटंल आवक झालेल्या पपईला सर्वसाधारण ४०० रुपये, ९ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे सर्वसाधारण दर ५०० रुपये, ढोबळ्या मिरचीची आवक ५ क्‍विंटल, सर्वसाधारण दर १९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा मिळाला.

१३५ क्‍विंटल आवक झालेल्या गाजराचे सर्वसाधारण दर ९५० रूपये, ४ क्‍विंटल आवक झालेल्या वालशेंगांना सर्वसाधारण २४०० रुपये, कारल्याची आवक ८ क्‍विंटल, सर्वसाधारण दर १२०० रुपये,प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.


इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली...
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने...
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५००...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
नाशिकमध्ये लाल कांद्याच्या दरात सुधारणा...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात घेवडा, भेंडी, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये तुरीला क्विंटलला सव्वा सहा... नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात भाजीपाल्याचे दर स्थिर पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगलीत बेदाण्याला उच्चांकी २७१ रुपये दरसांगली ः होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाणा...
खानदेशात कांदा दर स्थिरजळगाव ः खानदेशात मागील महिनाभरापासून कांदा दर...
औरंगाबादमध्ये द्राक्षांना क्विंटलला...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात हरभरा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात हरभरा दरात सुधारणा झाली असून, दर...
राज्यात चिंच ५००० ते १२५०० रुपये क्विंटललातुरात प्रतिक्विंटलला ७००० ते १२५०० रुपये...
खानदेशात केळी कमाल १०००, तर किमान दर...जळगाव : खानदेशात केळीची आवक कमी आहे. दुसरीकडे...
सोलापुरात हिरवी मिरची दरात सुधारणासोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये लाल कांदा दरात सुधारणा कायमनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
वाईत नवीन हळदीची आवक सुरू वाई, जि. सातारा ः येथील शेती उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते...कोल्हापूर : येथील बाजार समितीत रविवारी (ता. १४)...
पुण्यात भेंडी, टोमॅटोच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात द्राक्ष २५०० ते १५००० रुपयेजळगावात क्विंटलला ५००० ते ८००० रुपये जळगाव ः...