agriculture news in Marathi Mosambi has no demand Maharashtra | Page 3 ||| Agrowon

मोसंबी मागणीअभावी बागेतच

संतोष मुंढे
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

पाच एकर क्षेत्रातील मोसंबीच्या झाडावर मृग बहाराची फळे आहेत. गळ वाढली आहे, बागवान घ्यायला तयार नाहीत व खरेदीही ठप्प आहे. 
- गणेश किडे, मोसंबी उत्पादक, बोधलापुरी, जि. जालना 

औरंगाबाद: परिपक्व झालेल्या मोसंबीच्या मृग बहाराच्या विक्रीला कोरोना प्रादुर्भावाचा फटका बसला आहे. जवळपास ५० टक्के मृग बहाराची फळे झाडावर असताना मागणीच नसल्याने मोसंबीची खरेदीच थांबली. त्यामुळे मृग बहाराची फळे बागेतील झाडांवर असलेले मोसंबी उत्पादक संकटात सापडले आहे. 

मराठवाड्यातील जालना व औरंगाबाद जिल्हा मोसंबीचे आगार मानले जाते. आपल्या चवी व गुणधर्मामुळे जालन्याच्या मोसंबीला जीआय मानांकन मिळाले आहे. मोसंबीचे राज्यात उत्पादनक्षम जवळपास ३३ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी जवळपास २२ ते २५ हजार हेक्टर क्षेत्र औरंगाबाद व जालना जिल्ह्यात आहे. साधारणतः मृग व आंबे बहार मोसंबी उत्पादक शेतकरी घेतात. मराठवाड्यातील आंबे बहराच्या मोसंबीला सर्वाधिक दर व मागणी असते. शिवाय मृग बहाराची मोसंबी उत्तर भारतात ज्यूस साठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. 

प्रतिकूल परिस्थितीमुळे आंबे बहरातील अडचणी लक्षात घेता यंदा लगडलेल्या मृग बहराच्या उत्पादनातून हाती काही पडेल अशी मोसंबी उत्पादकांना आशा होती. परंतु आजमितीला जवळपास निम्म्या मोसंबी बागांमध्ये मृग बहाराची फळे झाडावर असतानाच उत्तर भारतातून मोसंबीची मागणी थांबली. त्याचा थेट परिणाम औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील बागवान व व्यापाऱ्यांकडून मोसंबीच्या बागा व उत्पादित मोसंबी खरेदी करण्यावर झाला. खरेदी केलेली मोसंबी पाठवायची कुठे हाच प्रश्न असल्याने मोसंबीची खरेदी थांबल्याचे व्यापारी सांगतात. 

प्राप्त माहितीनुसार, आपल्या भागात उत्पादित मोसंबीची सर्वाधिक मागणी उत्तर भारतातून असते. साधारणतःा १५ मार्च पासून एप्रिलअखेर पर्यंत ही मागणी सर्वाधिक असते.नेमके याच कालावधीत कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन झाल्याने उत्तर भारतातील ज्यूस चे छोटे-मोठे उद्योग बंद पडले व मोसंबी ची मागणी टप्प झाली.

लॉकडाऊन पूर्वी जी मोसंबी पाठवली होती तिची उचल न झाल्याने आणखी मोसंबी खरेदी करून पाठवावी कशी हा प्रश्न व्यापाऱ्यांचा समोर असल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. दुसरीकडे बागांमध्ये परिपक्व झालेल्या मोसंबीच्या फळांची गळ वाढली असून वाढत्या तापमानामुळे त्यावर डाग पडनेही सुरू झाले आहे.

येत्या पंधरवड्यात परिपक्व असलेली मोसंबी तुटल्या न गेल्यास त्याचा मोठा फटका बसणार असल्याचे मोसंबी उत्पादकांनी सांगितले. १५ एप्रिलनंतर आंध्रातील मोसंबी विक्रीसाठी तयार असेल त्यामुळे त्याचाही परिणाम आपल्या मृग बहराच्या मोसंबीच्या मागणीवर होण्याची शक्यता व्यापारी वर्गाच्या सूत्रांकडून वर्तविली जात आहे. 

कृषी विभागाचे बाजार समित्यांना पत्र 
परिपक्व झालेल्या मोसंबीच्या विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाल्याने जालना कृषी विभागाच्यावतीने महाराष्ट्रातील वाशी, मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या बाजार समित्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्राच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात मोसंबीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे. जवळपास १० हजार टन मोसंबी विक्रीसाठी तयार असून मागणी असल्यास ती जालना बाजार समिती किंवा जालना कृषी विभागाकडे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधोक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली. यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी जालना बाजार समितीत बैठकही घेण्यात आल्याचे श्री. शिंदे म्हणाले. 

प्रतिक्रिया
जवळपास १ हजार झाडांवर किमान २५ टन मोसंबीचा मृग बहार आहे. ना बागवान विचारतोय ना खरेदी सुरू आहे. मृग बहाराची फळ होणारी गळ पाहता टिकतील पंधरवडाभर टिकतील की नाही काय सांगाव. 
- राजेंद्र चोरमले, मोसंबी उत्पादक, घुंगर्डे, हदगाव, ता. अंबड, जि. जालना 

उत्तर भारतच नव्हे तर कुठूनही मागणी नाही. जो माल आधी पाठविलाय त्याचीच विक्री बाकी आहे. उत्तर भारतात ज्यूससाठी आपली मोसंबी खरेदी केली जाते. ज्यूस विक्री केंद्रच बंद पडल्याने मागणी नाही. 
- नाथा घनघाव, अध्यक्ष, मोसंबी अडतीय असोसिएशन, जालना. 
 


इतर अॅग्रो विशेष
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...
उष्णतेच्या लाटेने पिके होरपळलीपुणे : राज्यात मराठवाडा, विदर्भासह खानदेशात...
संसर्गाचे थैमान, महाराष्ट्र, तामिळनाडू...नवी दिल्ली : जगातील अन्य देशांसोबतच भारतातही...
सहकारी क्षेत्रातील दुग्ध उद्योगांसमोर...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
दूध रूपांतर योजनेचे १०० कोटी थकले पुणे: राज्यातील अतिरिक्त दुधाचे खरेदी करून भुकटी...
मॉन्सूनसाठी तयार होतेय पोषकस्थिती...पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात उन्हाच्या झळा असह्य पुणे: सुर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका...
नियमित कर्जदारांना द्या ५० हजाराचे...गोंदिया ः कोरोनामुळे प्रभावीत शेतीक्षेत्राला...
शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा...मुंबईः राज्यात  ५० हजार उद्योग सुरु झाले....
कापसाचा हमीभाव २६० रुपयांनी वाढवा :...नवी दिल्लीः कापसाच्या हमीभावात गेल्या वर्षीच्या...
भेसळयुक्‍त धान बियाणे पुरविणाऱ्या...भंडारा  ः गेल्या हंगामात भेसळयुक्‍त...