Agriculture news in Marathi Most applications from Marathwada for the benefit of 'Animal Husbandry' | Agrowon

‘पशुसंवर्धन’च्या लाभासाठी मराठवाड्यातून सर्वाधिक अर्ज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 डिसेंबर 2021

अर्ज प्रक्रियेत मराठवाड्याने आघाडी घेतली आहे. अर्ज करण्यासाठी ४ ते ६ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांत मराठवाड्यातील लातूर वगळता सात जिल्ह्यांचा समावेश असल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध लाभाच्या योजनांसाठी सुरू असलेल्या अर्ज प्रक्रियेत मराठवाड्याने आघाडी घेतली आहे. अर्ज करण्यासाठी ४ ते ६ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांत मराठवाड्यातील लातूर वगळता सात जिल्ह्यांचा समावेश असल्याचे चित्र आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांत ३७ हजार ३२ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते.

राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत शाश्‍वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. वैयक्‍तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेमध्ये गेली तीन वर्षे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. 

४ ते १८ डिसेंबर दरम्यान या योजनांसाठी अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच AH-MAHABMS या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशनवरूनही अर्ज व योजनेविषयी माहिती मिळणार आहे. १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ हा टोल फ्री क्रमांकही अर्जदारांच्या सोयीसाठी देण्यात आला आहे. 

प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार योजनेचा अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्‍य होणार आहे. अत्यंत सुलभ ऑनलाइन पद्धतीमुळे अर्जदाराने केवळ आपला दिलेला मोबाईल क्रमांक न बदलण्याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.
- डॉ. प्रदीप झोड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्‍त औरंगाबाद


इतर बातम्या
अंदाजपत्रकातून कृषी क्षेत्राला काय हवे...लवकरच २०२२-२०२३ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रक...
कृषी तंत्रज्ञान,ॲक्वाकल्चर क्षेत्रातील...२०२२ च्या केंद्रीय अंदाजपत्रकाच्या पार्श्वभूमीवर...
Weather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...
भारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...
Top 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...
पेनटाकळी प्रकल्पबाधित गावांना तातडीने...बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
नवीन बोअरवेलऐवजी `फ्लशिंग’वर भर नागपूर : उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात...
ज्वारीच्या राखणीसाठी कणसाला संरक्षण नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता...
वाशीमलाही मिळाला १५ कोटींचा वाढीव निधी वाशीम ः जिल्ह्यातील विकासकामांना निधीची गरज...
जळगाव जिल्ह्यातील १४ वाळू लिलाव गटाची...जळगाव ः जिल्ह्यात भडगाव, पाचोरा, चोपडा येथील तीन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक ...सोलापूर ः राज्यात नावाजलेल्या सोलापूर जिल्हा...
शेतीमालाच्या विक्रीसाठी मूल्यसाखळी...सोलापूर ः शेतकरी उत्पादनात आता पुढे आहेत. त्यांना...
जळगाव : खासगी संस्था, सोसायट्यांच्या ...जळगाव : ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे...
सांगलीत पीक कर्जवाटपात बॅंकांचा हात...सांगली ः रब्बी हंगामातील पिकांची पेरणी अंतिम झाली...
‘पाच हजार १२२ कुटुंबांना परभणी...परभणी ः ‘‘‘जल जीवन मिशन’ कार्यक्रमांतर्गत...
परभणीत ३८.९१ लाखांच्या निधीची कामे...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात एकात्मिक...
क्षारपड जमीन सुधारणा संस्थांना ११.९०...कोल्हापूर : उर्जांकुर श्री दत्त पॉवर कंपनी...
उत्तर महाराष्ट्राला थंडीचा विळखा पुणे : उत्तर भारतातील गोठविणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे...
राज्यातील ५१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना...मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक...
‘सीडी रेशो’ घसरलेल्या  जिल्ह्यांमध्ये...पुणे ः कर्जवाटप व ठेवीचे गुणोत्तर (सीडी रेशो)...