लष्करी अळीवर बऱ्यापैकी नियंत्रण : डॉ. मोटे

लष्करी अळीवर बऱ्यापैकी नियंत्रण : डॉ. मोटे
लष्करी अळीवर बऱ्यापैकी नियंत्रण : डॉ. मोटे

औरंगाबाद : ‘‘लष्करी अळीचा प्रादूर्भाव सर्वदूर जाणवत असला, तरी उपाययोजनांबाबत शेतकरी जागरूक असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रादूर्भावावर नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश आले आहे,’’ अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी दिली.

प्रक्षेत्र भेट आणि जिल्हा मासिक चर्चासत्राचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी (ता.२५) शेतकऱ्यांशी थेट बांधावर जावून संवाद साधला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि विद्यापीठातंर्गत विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रातर्फे एकदिवसीय क्षेत्रीय भेट आणि मासिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सुर्यकांत पवार, डॉ. मोटे आदी उपस्थित होते.   

गंगापूर तालुक्‍यातील तुर्काबाद, लिंबेजळगाव, आंबेलोहळ, जांभाळा आदी ठिकाणी अधिकारी, तज्ज्ञांनी भेटी दिल्या. सेंद्रीय शेती गटाला भेट, सामूहिक शेततळे, अंजीर बाग पाहणी, शेडनेटमधील पिकांची अवस्था, अमेरिकन लष्करी अळीचे मक्‍यावरील आक्रमण त्याविषयी केलेल्या उपाययोजना आदीची माहिती त्यांनी जाणून घेतली. मोटे म्हणाले, ‘‘पैठण तालुक्‍यात पावसाअभावी परिस्थिती बिकट आहे. परंतु, पिकापुरता पाऊस झाल्याने इतर भागातील पिके अजून टिकून आहेत. अर्थात पावसाचा खंड वाढल्यास वाढीच्या अवस्थेतील या पिकांवर त्याचा थेट परिणाम होईल.

’’डॉ. पवार म्हणाले, ‘‘आंतरपीकपध्दतीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. कपाशी पिकावर माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे. मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव १५ ते २० टक्‍के क्षेत्रावर दिसून आला. शिफारशीत औषधांचा नियंत्रणासाठी वापर करण्याचे धोरण अजूनही काही ठिकाणी राबविले जात नसल्याचे दिसून येत आहे. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी पोंग्यात औषध टाकण्याची, पाण्याच्या ताण पडलेल्या भागात १३:००: ४५ दहा मिली प्रतिदहा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करण्याची गरज आहे.’’

गंगापूरचे तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांनी चर्चासत्राच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com